Crime News Solapur : नंदेश्वरातील तिहेरी खुनामागे शेती व पूर्व वैमनस्याचे प्राथमिक तपासात कबुली

चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले.
crime news
crime newsesakal

मंगळवेढा : तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी खून सत्रामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेल्या खून प्रकरणात समाधान महादेव लोहार वय 33 वर्षे यास ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.

काल दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05/30 वाचे सुमारास मोजे नंदेश्वर लवटे वस्ती ता. मंगळवेढा येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दिपाली बाळु माळी वय 25 वर्ष,पारुबाई बाबाजी माळी वय 55 वर्षे., संगीता महादेव माळी वय 47 वर्षे या तीन महिलांचा अज्ञात हत्याराने व दगडाने मारुन खुन केल्याची माहिती पोलीस पाटील संजय गरडे देताच पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि सत्यजित आवटे,

सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई सौरभ शेटे, परि. पोसई पुरूषोत्तम धापटे, सपोफी अविनाश पाटील, पोहेकॉ दयानंद हेंबाडे पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोना विठ्ठल विभुते, पोना विक्रम काळे, पोना बापू पवार, पोकों कैलास खटकाळे पोकों राजु आवटे हे तात्काळ घटनास्थळी हजर होवून परस्थितीची पाहणी केली. आजुबाजुच्या लोकाकडे सदर खुन कोणत्या कारणासाठी, कशामुळे.

कोणासोबत पुर्वीची भांडणे होती. काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला व गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने चौकशी करुन संशयीत समाधान महादेव लोहार वय 33 वर्षे यास ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली दिली,

तपासात शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातून हातातील बेडग्याने (कुदळीने ) तीन महिलाच्या डोक्यात मारुन व डोकीत दगड घालून जिवे ठार मारल्याचे सांगीतले आहे.आरोपीवर भादवि कलम 302 असुन आरोपीस अटक केली

सदर खुन करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे का याचा तपास पो.नि.रणजित माने करीत आहे. घटनास्थळी उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com