अज्ञात चोरट्यांनी मालट्रकसह १३ लाख ६१ हजाराचा माल चोरून नेला...

मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल
crime news thieves stole truck and goods worth Rs 13 lakh 61 thousand solapur police
crime news thieves stole truck and goods worth Rs 13 lakh 61 thousand solapur police sakal

मोहोळ : रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाचे हातपाय बांधून त्याला उसाच्या फडात टाकून, त्याच्या डोक्याला बंदूक लावून, त्याला तलवारीचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील माला सह मालट्रक, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 13 लाख 61 हजाराचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवार ता 14 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-कुर्डुवाडी महामार्गावरील आष्टी शिवारातील माळी वस्ती जवळ घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,प्रवीण अंबादास सरगर वय 35 रा नाझरा ता सांगोला हे 4 जून रोजी मालट्रक क्रमांक एम एच 10 झेड 1352 मधून जालना येथून आयकॉन कंपनीचे स्टील घेऊन सांगली कडे निघाले होते. दरम्यान सरगर यांनी लघुशंकेसाठी मालट्रक आष्टी शिवारातील माळी वस्ती जवळ थांबवुन खाली उतरले तसेच काचेवर आलेली ताडपत्री बाजूला सरकावली. त्याच वेळी पांढऱ्या रंगाची इंडिका कार त्या ठिकाणी आली व त्यातून 6 जण उतरले. त्यांनी काही कळायच्या आतच सरगर याला धरून उसाच्या शेतात नेले त्या ठिकाणी त्याच्या उरावर बसुन त्याचे हातपाय बांधले तसेच त्याला मारहाणही केली.

त्याच्या डोक्याला बंदूक लावून तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.त्यावेळी त्याच्या खिशातील रोख रक्कम 20 हजार रुपये, ट्रक मधील 8 लाख 40 हजाराचे बारा टन स्टील, पाच लाखाची ट्रक व मोबाईल असा एकूण 13 लाख 61 हजार 500 हजाराचा माल चोरून नेला. थोड्या वेळाने उजाडल्यावर प्रयत्न करून सरगर याने पायाची दोरी कशीबशी सोडली व तो रस्त्यावर आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरातील इसमाच्या मोबाईल वरून पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती दिली. या घटनेची फिर्याद प्रवीण अंबादास सरगर यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com