सोलापूर शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच

गुन्हेगारांना पकडल्यानंतर गवगवा; पण चोरी थांबविण्यात अपयशच
crime update Two-wheeler theft in Solapur 60 bikes Theft
crime update Two-wheeler theft in Solapur 60 bikes Theftsakal

सोलापूर : शहरात मागील साडेचार महिन्यांत जवळपास ६० हून अधिक दुचाकींची चोरी झाली आहे. अनेकदा पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलेही आणि चार-सहा दुचाकी पकडल्यानंतर त्याचा डंकाही पिटवला गेला. पण, शहरातील दुचाकी चोरी थांबविण्यात पोलिसांना अजूनही पूर्णत: यश आलेले नाही.काम करताना पोटाचा चिमटा घेत आयुष्याची पुंजी जतन करून सर्वसामान्य दुचाकी घेतात. कामाच्या ठिकाणी जाण्याची सोय होईल, मुला-मुलींना शाळेत सोडता येईल, अशी विविध कारणे त्यामागे आहेत.

पण, शहरातील मार्केट यार्ड असो वा सिव्हिल हॉस्पिटल अथवा कपड्याची दुकाने किंवा कामाच्या ठिकाणी, घरासमोर लावलेली दुचाकी चोरटे सहजपणे चोरून नेत आहेत. अनेकदा परजिल्ह्यातील, परराज्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. तरीही, दुचाकी चोरी का थांबत नाही, दुचाकी चोरणारे कोण आहेत, याचा संपूर्ण शोध पोलिसांना लागलेला नाही. गुरुवारी (ता. ७) दर्बी एक्सल्यूजी फलटण गल्ली येथून दुचाकी (एमएच १३, डीएच १८७३) चोरट्याने दुपारी चारच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी दीपक विठ्ठल गडगडे (रा. कर्णिकनगर शेजारील भैय्या वस्ती) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत धाव घेतली. दुसरीकडे, सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीच्या मोकळ्या जागेतून दुचाकी (एमएच १३, एआर ६७०४) चोरीला गेली, अशी फिर्याद स्वप्नील संजय चंदनशिवे (रा. जुना देगाव नाका) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठोस नियोजनातून हे प्रकार थांबतील असा विश्वास सोलापूरकरांना आहे.

आयुक्तालयाची डागडुजी महत्त्वाची आहे का?

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी शहरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यासंदर्भात सक्त सूचना केल्या होत्या. दरम्यान, शहरात घरफोडी, चोरी, मारामारी, अपघात, चेन स्नॅचिंग अशा घटना सारख्या घडतात. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास निश्चितपणे तशा प्रकारांना आळा बसू शकतो. पण, त्यासाठी निधी द्यायचा कोणी, हा प्रमुख प्रश्न आहे. दुसरीकडे मात्र, लाखो रुपयांचा खर्च करून शहर पोलिस आयुक्तालय इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com