Damage of farmers houses crops livestock rural areas due to unseasonal rain solapur
Damage of farmers houses crops livestock rural areas due to unseasonal rain solapursakal

Weather Update : मंगळवेढ्याच्या ग्रामीण अवकाळीचा तडाका

अवकाळी वादळासह झालेल्या पावसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घराचे,फळ पिकाचे,जनावराचे नुकसान

मंगळवेढा : अवकाळी वादळासह झालेल्या पावसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घराचे,फळ पिकाचे,जनावराचे नुकसान झाले आहे.सायंकाळी पाचच्या दरम्यान आलेल्या वादळामुळे भाळवणी येथे दोन घराचे पत्रे उडाले तर अंकुश सावंजी यांच्या डाळिंब तर चंद्रकांत मोरे यांच्या मका पिकाचे नुकसान झाले,खोमनाळ येथे संभाजी कोडग यांच्या पपई पिकाचे नुकसान झाले.

जालीहाळ येथे आसंत जावीर यांच्या घराचे तर विष्णू भंडगे यांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले. आंधळा मुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर वीज पुरवठा ग्रामीण भागात खंडित झाला महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.नंदेश्वर येथे वीज पडल्यामुळे सिध्देश्‍वर नामदेव गरंडे याची चार गायी दगावल्या.

त्यामुळे या कुटुंबाचे साधन आपत्तीत संपल्यामुळे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले सध्याच्या काळात शेतीमध्ये उत्पादित खर्च पिकांसाठी उत्पादनासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात असताना मिळणारे उत्पादन तुकडे असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असतानाच वादळामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

त्यामुळे आणखीनच शेतकरी अडचणीत आला गतवर्षी परतीचे पावसाने केलेल्या नुकसानी देखील शासनाने ठराविक मंडल मधील शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याप्रती सवती वागणूक देण्याचा प्रयत्न केला.या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. गत आठवड्यामध्ये लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, मारापुर, सलगर लवंगी भागात देखील नुकसान केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com