
तिसऱ्या फेरीत ही समविचारीचे उमेदवार आघाडीवर चौथ्या फेरीचा निकाल बाकी
मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये समविचारे गटाचे सर्व उमेदवार तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवरच राहिले संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर अवताडे मोठ्या फरकाने विजयी झाले तर धनगर समाजाचे नेते तानाजी खरात हे देखील मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होताच आघाडीवर असलेल्या गटाच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष साजरा केला. तीन फेऱ्यांमध्ये समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले धनगर समाजाचे नेते तानाजी खरात सर्वच आघाडीवरील उमेदवारात आघाडीवर आहे चौथ्या फेरीनंतर विजयी उमेदवाराचे मताधिक्य स्पष्ट होणार आहे.
संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर अवताडे तब्बल 145 मतांनी विजयी झाले संस्था मतदारसंघात बबनराव आवताडे यांचा धबधबा कायम राहिला.कारखान्याच्या सुरुवातीमधील काळ वगळता आतापर्यंत या मतदारसंघातून बबनराव आवताडे हे या प्रवर्गातून कायम संचालक राहिले आहेत यंदाच्या निवडणुकीत बबनराव आवताडे हे संस्था मतदारसंघातून माघार घेत त्यांनी या जागेवर त्यांचे पुत्र खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांना संधी दिली.नवखे असलेले सिद्धेश्वर अवताडे यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.या मतदारसंघात 160 मते होती त्यापैकी 154 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये 149 मध्ये सिद्धेश्वर आवताडे यांना मिळाली तर त्यांचे विरोधी जगन्नाथ रेवे यांना फक्त चार मते मिळाले.
प्रशासनाने दामाजी कारखान्याचे निवडणुकीचे मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडली.24 हजार 521 मताची चार फेरीत नियोजनबद्ध मतमोजणी सुरू आहे. वेळेत निकाल देण्यामध्ये प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार स्वप्निल रावडे, सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील,नायब तहसीलदार पंकज राठोड,सुधाकर धाईजे यांच्यासह अन्य कर्मचारी प्रयत्न केले तर मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने,सपोनि बापूसाहेब पिंगळे,अमोल बामणे,उपनिरीक्षक सौरभ शेटे,सत्यजित आवटे,यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.
समविचारी गटातून भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार,तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे हे तिसऱ्या फेरीत देखील आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीत मिळालेली मते कंसात तिसय्रा फेरीअखेरील एकूण मते पुढील प्रमाणे आ. समाधान आवताडे 2750 ( 825 ) ,नीला आटकळे 3663 ( 7830), मुरलीधर दत्तू 3232 (9152 ) ,गौरीशंकर बुरकुल 3244 ( 9750)गोपाळ भगरे 3169 ( 9604 ), राजेंद्र सुरवसे 2467( 7165 ) बाद 259( 907) ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट सचिन चौगुले2741 ( 8037) राजेंद्र चरणू पाटील 3268( 10105 ) , राजेंद्र सर्जेराव पाटील 2673( 7979 ) भारत बेदरे 3233( 9719) अशोक भिंगे 2660( 7724 ) , दयानंद सोनगे 3157 ( 9551 ) , बाद मते 191 ( 734 ) , मरवडे ऊस उत्पादक गट प्रदीप खांडेकर 2769 (8254 ) ,गणेश पाटील 2685 (7966) , बसवेश्वर पाटील 2665 ( 7716 ) ,शिवानंद पाटील 3374 ( 10277 ) ,रेवणसिद्ध लिगाडे 3198 ( 9663 ) ,औदुंबर वाडदेकर 3157 ( 9702) बाद मते 186 (680) भोसे ऊस उत्पादक गट उमाशंकर कनशेट्टी 2751 (8064 ),अंबादास कुलकर्णी 2711( 8020 ) भिवा दौलतोडे 3226 ( 9988) ,बसवराज पाटील 3286 ( 10014 ) , गौडाप्पा बिराजदार 3157 (9692),आबा बंडगर 2569 (7751) बाद मते 196(665) आंधळगाव ऊस उत्पादक गट प्रकाश भिवाजी पाटील 3317 (10091) , दिगंबर भाकरे 3238( 9868 ) सुरेश भाकरे 2735 ( 8117 ) महादेव लुगडे 3161 ( 9599 ) , विनायक यादव 2673( 7849 ) बाळासो शिंदे 2611 ( 7651 )
महिला राखीव निर्मला काकडे 3336 ( 10127 ) लता कोळेकर 3189 ( 9821 ) कविता निकम 2682 ( 7896 ) स्मिता म्हमाने 2533 ( 7595 ), मागासवर्गीय मतदार संघ तानाजी कांबळे 3323( 10014 ) युवराज शिंदे 2714( 8155 ) भटक्या विमुक्त जाती मतदार संघ तानाजी खरात 3450( 10404),विजय माने 2636 (7929 )
Web Title: Damaji Sugar Factory Election Third Round Leading Autade Tahnaji Kharat Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..