"आठवडी बाजार सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार!'

"आठवडी बाजार सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार!'
आठवडी बाजार
आठवडी बाजारCanva

ग्रामीण आठवडी बाजारामध्ये शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मोडनिंब (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार (Weekly market) बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या विक्रेत्यांबरोबरच आठवडी बाजारामध्ये असणारे छोटे व्यावसायिक, मिठाईवाले, भांडीवाले, कापड दुकानदार, शेती उपयोगी अवजारे विक्रेते, चर्मकार व्यवसाय, दोरखंड विकणारे, गृहोपयोगी वस्तू विकणारे, झाडू विकणारे, चटई विकणारे, फळ विक्रेते आदी व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व व्यावसायिक आठवडी बाजारामध्ये आपल्या कमी भांडवलामध्ये अल्प नफा कमवून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र कोरोनामुळे या सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे. (Demand from rural areas to start weekly market-ssd73)

आठवडी बाजार
वारकऱ्यांवर आली "येथेच माझे पंढरपूर' म्हणण्याची वेळ !

ग्रामीण आठवडी बाजारामध्ये शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे (गाई, म्हशी, बैल, शेळी, मेंढी) त्याचबरोबर कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद असल्यामुळे व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होत आहे. बाजार बंद असल्याने शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नसल्यामुळे महागाईमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या निर्णयानुसार राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने आदींना परवानगी दिली आहे. मात्र, आठवडी बाजाराला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आठवडी बाजार
पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

दरम्यान, व्यापाराबाबत असणाऱ्या अडचणी समजून घेऊन आठवडी बाजारासाठी योग्य ते निर्बंध घालून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा; अन्यथा मोडनिंब व मोडनिंब परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, अशा प्रकारचे निवेदन विक्रेते व व्यापाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne), ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांना देण्यात आले आहे.

बातमीदार : वीरेन कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com