शहरातील दुकानांसंदर्भात अजित पवारांनी बोलावली बैठक; आज होणार अंतिम निर्णय

सोलापूर शहरातील दुकानांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक
Lockdown
LockdownEsakal

महापालिकेतील विरोधक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभारले असून त्यांनी निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने आज महापालिकेसमोर आंदोलन केले.

सोलापूर : सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक असून रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून विडी उद्योग, गारमेंट (Garment), वस्त्रोद्योगावर (Textile) अवलंबून अनेकजण आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास काही तास परवानगी द्यावी, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मंत्रालयात मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसनचे सचिव असिम गुप्ता यांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील (Relief and Rehabilitation Department) विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. (Deputy Chief Minister Ajit Pawar called a meeting regarding shops in Solapur city)

Lockdown
खतांचे वाढीव दर रद्द केल्यानंतर कोणते खत किती रुपयांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर

कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील संसर्ग कमी होत असतानच सोलापूरच्या ग्रामीण भागाची चिंता अजूनही मिटलेली नाही. तर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन (Lockdown) शिथिलतेसंदर्भात जाहीर केलेल्या निकषांनुसार शहरातील दुकाने सुरू होण्यासाठी लोकसंख्येचा अडथळा आला. त्यातच ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी काढलेला निर्णय शहरासाठी आहे तसाच लागू करण्यात आला. 15 एप्रिलपासून कडक निर्बंध असल्याने शहरातील अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. त्यामुळे अनेकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

Lockdown
शहरातील दुकाने उघडणार? महापालिका आयुक्‍तांचा शासनाला प्रस्ताव

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील विरोधक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभारले असून त्यांनी निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने आज महापालिकेसमोर आंदोलन केले. तत्पूर्वी, आमदार प्रणिती शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या परीने वरिष्ठ स्तरावरूनच सकारात्मक निर्णय व्हावा, असा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात बैठक बोलावली असून, मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर महापालिकेच्या आयुक्‍तांनी पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भातही त्या ठिकाणी चर्चा होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णयाची शक्‍यता वर्तविली जात आहे.

बैठकीतील चर्चेचे विषय...

  • शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असून मृत्यूदरही झाला कमी

  • शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत 12 लाखांहून अधिक; कामगारांचे शहर असल्याने परवानगीविषयक चर्चा

  • मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिव, मदत व पुनर्वसनच्या सचिवांची बोलावली बैठक

  • सोलापूर शहरासाठी स्वतंत्र निर्णय घेता येईल का? महापालिका आयुक्‍तांच्या प्रस्तावावर सुरू झाली चर्चा

  • शहर-जिल्ह्यातील बेड, पॉझिटिव्हिटी व संभाव्य शक्‍यतेचा घेतला अंदाज; आज (बुधवारी) सायंकाळपर्यंत होणार अंतिम निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com