esakal | मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरव्दारे थेट वीज पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरव्दारे थेट वीज पुरवठा

फिडरमुळे 24 तास वीज उपलब्ध होणार असल्याने जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी कायम उपलब्ध होणार आहे.

मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरव्दारे थेट वीज पुरवठा

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा शहर व लगतच्या दोन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात खंड पडू नये, म्हणून 24 तास वीज पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरद्वारे थेट वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यात पुरेशा दाबाने मुबलक पाणी भविष्यात उपलब्ध होणार आहे. (direct power supply will be provided through express feeder for water supply of mangalwedha city)

हेही वाचा: निमगाव परिसरात युरियाची टंचाई! शेतकऱ्यांकडून संताप

या कामासाठी नगरपालिकेच्या 14 व्या वित्त आयोगातून 96 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून येथील पंढरपूर रोडवरील सौर प्रकल्पापासून ते भीमा नदीवरील उचेठाण बंधारा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट एक्सप्रेस फिडरने वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे दर बुधवारी व पावसाळा व वादळात खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत होती. फिडरमुळे 24 तास वीज उपलब्ध होणार असल्याने जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी कायम उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा सर्व्हे सुरू; 24 गावांना पाणी देण्याचा प्रयत्न

सध्या शहराला नगरपालिकेचे 3400 नळ कनेक्शन धारक आहेत. बत्तीस हजार लोकसंख्येसाठी पस्तीस लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहरातील नळ कनेक्शन धारक, दोन ग्रामपंचायत, हद्दवाढ भाग याचा विचार करता सध्या एक दिवसाआड पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या फिटरचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना प्रति माणसी 135 लिटर प्रमाणे व पुरेशा प्रमाणात दररोज पाणी मिळणार आहे. तालुक्यामध्ये निम्म्याहून अधिक गावे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहेत, अशा परिस्थितीत नगरपालिकेने मात्र शहर व लगतच्या नागरिकांना दुष्काळाची तीव्रता न जाणवू देता पुरेशा दाबाने प्रमाणात पाणीपुरवठा केला आहे. मात्र यापुढील काळात पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार नाही.

हेही वाचा: निवडणुकीनिमित्त मंगळवेढा पोलिसांचा रूट मार्च; शंभर जवान, सहा अधिकाऱ्यासह गाड्यांचा फौजफाटा

मंगळवेढा ते उचेठाण एक्स्प्रेस फिडरचे भुमिपूजन नगराध्यक्षा अरूणा माळी, नियोजन समिती सदस्य अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी, संकेत खटके, सोमनाथ माळी, चंद्रकांत पडवळे, दादा टाकणे, सचिन शिंदे, चंद्रशेखर कोंडूभैरी, महावितरण अभियंता कोळेकर, अजय नरळे, सुहास झिंगे, विनायक साळुंके आदी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनास सादर

नगरपालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यानुसार शहरवासियांना 24 तास पाणी देण्यासाठीचा आमचा प्रयत्न सुरू आहे, साठेनगर येथे 6 लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

- अजित जगताप, पक्षनेता

(direct power supply will be provided through express feeder for water supply of mangalwedha city)