त्यांचा पगार चालू आहे, मात्र आमची चूल बंद आहे; दिव्यांग लेखनिकांची उपासमार

विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत.
Strike
Strike Sakal media
Summary

विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत.

सोलापूर - विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी (Revenue Employee) ४ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत. सरकारी कामे बंद (Government Work Close) असल्याने विविध अर्ज, निवेदने लिहून देणाऱ्या दिव्यांग लेखनिकांची उपासमार सुरू झाली आहे. आज संपाचा नववा दिवस असला तरी सलग सुट्ट्या आणि संप (Strike) यामुळे दिव्यांगाच्या (Divyang) रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महसूल कार्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी त्यांचे वेतन सुरू आहे मात्र, हातावरचे पोट असणाऱ्या दिव्यांग लेखनिकांची मात्र, चूल बंद आहे.

मार्चअखेर मुळे अनेक सरकारी कामे अडलेली असतात. एप्रिल महिन्यात सर्वाधिक सरकारी कामे सुरू होतात. नव्या वर्षात नव्या जोमाने चार पैसे मिळतील, अशी आशा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दिव्यांग लेखनिकांना होती. मात्र, एप्रिलच्या एक तारखेला जी कार्यालये ओस पडली ती पुन्हा आजपर्यंत भहरली नाहीत. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच दोन दिवसांच्या सरकारी सुट्ट्या आणि चार एप्रिलपासूनच बेमुदत संप यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ओस पडले आहे.

या परिसरातच ५० ते ६० दिव्यांग लेखनिक आहेत. सरकारी कार्यालयातील विविध कामांसाठी लागाणार अर्ज लिहून देतात. या कामाचे चार पैसे मिळतात त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना या नावाने या दिव्यांग कर्मचाऱ्यांची संघटना आहे. अपंग असल्याने कोणतेही शारीरिक कष्टाची कामे त्यांना करता येत नाहीत. अशातच जेमतेम शिक्षण यामुळे या दिव्यांगांनी लेखनिकांचे काम पत्कारले आहे. अर्ज, निवेदन लिहून त्यांना पोटापुरते पैसे मिळायचे तेही आता संपामुळे मिळणे कठीण झाले आहे.

सरकारी कार्यालये बंद असल्याने अनेकांची कामे खोळबंली आहेत. महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचाराकरिता, रुग्णाची कागदपत्रे तातडीने हवी असातात. मात्र, कार्यालये बंद असल्याने लोकांची कामे खोळबंली आहेत. कार्यालयीन कामकाज बंद असल्याने आमच्या हाताला काम नाही.

- वासुदेव व्हनकोंबडे, दिव्यांग लेखनिक

महागाईच्या काळात अत्यल्प कमाईवर घर चालवणे कठीण आहे. अशातच मागील तेरा- चाैदा दिवसांपासून कमाई बंद झाली आहे. यामुळे घर चालवणे कठीण आहे.

- अरीफ अत्तार, दिव्यांग लेखनिक

एप्रिल महिन्यात सरकारी सुट्या जास्त आहेत. अशातच संपामुळे रोजीरोटी बंद झाली आहे. संप कधी संपणार आणि सरकारी कार्यालये पुन्हा कधी सुरू होणार याची आम्ही वाट पाहत आहोत.

- शशिकांत शिंदे, लेखनिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com