कोरोनाकाळात दिवसा 50 हजार तर महिन्याला 7 लाख अंड्यांची होतेय शहरात विक्री !

कोरोनाकाळात दिवसा 50 हजार तर महिन्याला 7 लाख अंड्यांची होतेय शहरात विक्री
Eggs
EggsEsakal

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) उद्रेकामुळे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढवण्यासाठी रुग्णांबरोबरच नागरिकांकडून आहारात अंड्यांचा (Eggs) अधिकाधिक समावेश केला जात आहे. यामुळे शहरात गेल्या काही दिवसांत अंड्यांची मागणी दुप्पट झाली असून, रोज 50 हजार तर महिन्याकाठी 7 लाख अंड्यांची विक्री होत असल्याची माहिती व विक्रेत्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (During the Corona period, fifty thousand eggs a day and seven lakh eggs a month were sold in the city)

Eggs
राज्यात "मिशन ऑक्‍सिजन'ला सुरवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव प्रकल्पाचे उद्‌घाटन

अनलॉकनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. रोजच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता डॉक्‍टर तसेच तज्ज्ञ व्यक्तींकडून शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रुग्णांना तसेच नागरिकांकडून दैनिक आहारात अंड्यांचा अधिक समावेश केला जात आहे. याच कारणामुळे गेल्या महिनाभरापासून अंड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात पंढरपूर, खानापूर, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून अंड्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती अंडे विक्रेत्यांनी दिली.

Eggs
कामे बंद अन्‌ त्यात महागाईच्या असह्य झळा ! इंधन, खाद्यतेलांच्या दरांचा बाजारपेठेत कहर

वाढत्या मागणीच्या तुलनेत अंड्यांचा पुरवठा कमी होत असल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांच्या आहारात देखील अंड्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील याचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करीत आहेत.

ठळक बाबी

  • दररोज 50 हजार अंड्यांची विक्री

  • कोरोनाबाधित रुग्णांच्या आहारात अंड्यांचा समावेश

  • अंड्यांची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने किमतीत वाढ

  • कोरोनापूर्वी शहरात महिन्याकाठी चार लाख अंडी विक्री होत असे

  • आता दरमहा 7 लाख अंड्यांची होतेय विक्री

  • खानापूर, पंढरपूर, आंध्र प्रदेश येथून अंड्यांचा पुरवठा

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पुरवठा कमी होत असल्याने अंड्यांची किंमत वाढली आहे. आगामी काळात या किमतीत अधिक वाढ होण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

आहारात अंड्यांचा समावेश केल्याने प्रोटीन शरीरात वाढण्यास मदत होते. आठवड्यातून तीन-चार दिवस उकडलेले अंडे खावे.

- डॉ. निशिकांत मस्के, सोलापूर

कोरोनापूर्वी शहरात साधारणत: दररोज 50 हजार अंड्यांची विक्री होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मागणी दुप्पट झाली असून महिन्याला साधारणत: सात लाख अंड्यांची विक्री होत आहे.

- इब्राहिम शेख, अंडे विक्रेते, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com