कल्लहिप्परगे परिसरात धुमाकूळ घालून रानगवा गडप !

कल्लहिप्परगे परिसरात रानगव्याचा धुमाकूळ
कल्लहिप्परगे परिसरात धुमाकूळ घालून रानगवा गडप !
Canva
Summary

कल्लहिप्परगे येथील दहा ते बारा एकर उसात रानगवा घुसला आहे. त्याला शोधण्यासाठी पथक लावले असून परिसरातील जेऊर, शिरवळ व हंद्राळ आदी भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले.

अक्कलकोट (सोलापूर) : कल्लहिप्परगे (ता. अक्कलकोट) (Akkalkot) येथे रविवारी दुपारी एक वाजता अचानक रानगवा (Indian Bison) दिसल्याने परिसरात गोंधळ उडाला. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे व मुनाफ चिरके आदींनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. तेव्हा त्वरित वनविभाग (Forest Department) व पोलिस (Police Department) प्रशासनाने याची दखल घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. संबंधित यंत्रणा कल्लहिप्परगे गावात पोचताच रानगव्याचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला. मात्र रविवारी कल्लहिप्परगे परिसरातील उसाच्या फडात घुसलेला रानगवा सोमवारी दिवसभर वनविभाग व पोलिसांना शोधूनही सापडला नाही. (Seeing Indian Bison in Kallahipparge area, fear spread among the citizens)

कल्लहिप्परगे परिसरात धुमाकूळ घालून रानगवा गडप !
अमिताभ बच्चन यांनी रिट्‌विट करून दाखवली विठ्ठलभक्ती !

रानगव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलिस प्रशासन प्रयत्न करताना दिसून येत होते. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळत होते. संतोष गुजा, पुजारी यांच्या ऊसशेतीचे रानगव्याने नुकसान केले. तेव्हा संबंधित वनविभाग व पोलिस परिसरातील गावांना संदेश देत रानगव्यापासून धोका होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला व तोंडी निरोप देखील गोंधळाने सगळ्यांना मिळत गेला.

कल्लहिप्परगे परिसरात धुमाकूळ घालून रानगवा गडप !
बापमाणूस! मुलाच्या क्रिकेट मैदानासाठी दिली पाच एकरची द्राक्षबाग

परिसरात नदीचा भाग असल्याने व ऊस शेती जास्त असल्याने त्यात गवा आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत रानगव्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलिस प्रशासनाचा निरंतर प्रयत्न सुरूच होता. याबद्दल वनपाल शंकर कुताटे म्हणाले, की दहा ते बारा एकर उसात तो गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पथक लावले असून परिसरातील जेऊर, शिरवळ व हंद्राळ आदी भागात सावधगिरी बाळगायला सांगितले आहे. पण रानगवा हंद्राळच्या दिशेने गेल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र सोमवारी दुपारपर्यंत रानगवा दिसून आला नाही. रानगवा सहसा माणसांवर हल्ला करत नाही, मात्र त्याला डिवचल्यास तो अंगावर येऊ शकतो.

वनविभागाच्या टीममध्ये धैर्यशील पाटील व जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शंकर कुताटे, गंगाधर विभूते, टी. एम. बादने, मुन्ना निरवणे आदींसह सहकारी रानगव्याच्या शोधात आहेत. तसेच दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिनाथ कलशेट्टी, संजय पांढरे, भाऊ सरवदे, लक्ष्मण कांबळे, गोलू बिराजदार, पोलिस पाटील संतोष गुजा व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी गावपातळीवरील शिवसेना कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन वनविभाग व पोलिस प्रशासनाला मदत करत आहेत.

राजशेखर चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com