सोलापूर : पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन सेंटरची उभारणी

‘वाडीया’मध्ये कोविड केअर सेंटर; नवीन डॉक्‍टरांची होणार थेट भरती
solapur
solapursakal

सोलापूर : शहरात कोरोनाचे रुग्ण(corona patient) वाढत असून मागील आठ दिवसांत शहरात १३३ रुग्ण वाढले आहेत. चार महिन्यांच्या तुलनेत शहरात आठ दिवसांत सर्वाधिक १२५ सक्रिय रुग्ण वाढले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील संशयितांना आता क्‍वारंटाईन केले जाणार असून त्यासाठी केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन सेंटर(Quarantine center) उभारले जात आहे. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील वाडीया हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर(wadia hospital covid care center) सुरु केले जात आहे. शहरात आठ दिवसांत पाच हजार २१३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत. संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेत महापालिकेने आता क्‍वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर उभारणीचा निर्णय घेतला आहे. वाडीया हॉस्पिटलमध्ये पहिल्या टप्प्यात १०० बेड्‌स उपलब्ध असणार आहेत. दु

solapur
दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!

सरीकडे बॉईज हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवरील उपचाराची सोय केली जाणार आहे. दरम्यान, रुग्ण वाढत असतानाच महापालिकेला वाढीव डॉक्‍टरांची गरज भासणार आहे. संशयितांचे टेस्टिंग, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी मनुष्यबळ लागणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात दहा डॉक्‍टर आणि २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्‍ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, मक्‍तेदाराच्या माध्यमातून डॉक्‍टरांची भरती करण्यासंदर्भात प्रशासनाने यापूर्वी निर्णय घेतला होता. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर महापालिका आयुक्‍तांनी तो निर्णय मागे घेतला आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून कंत्राटी डॉक्‍टरांची नियुक्‍ती केली जाणार आहे.

solapur
दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!

पाच दिवसांनी टेस्ट करून सुटका

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्‍तीचा शोध कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्या व्यक्‍तींना क्‍वारंटाईन सेंटरमध्ये पाच दिवस राहणे बंधनकारक आहे. पाच दिवसानंतर त्या व्यक्‍तीची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याचदिवशी त्यांना घरी सोडले जाणार आहे. संपर्कातील व्यक्‍तीचा रिपोर्ट पाच दिवसांनी पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यावर कोविड केअर सेंटर तथा रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

डॉक्‍टरांना दरमहा ३० हजारांचे वेतन

कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने खासगी एमबीबीएस व बीएएमएस डॉक्‍टरांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्‍ती दिली होती. त्यांना दरमहा ३० हजारांचे मानधन ठरले होते. परंतु, उपायुक्‍त धनराज पांडे यांच्या पत्रावरुन त्यांचे वेतन ४० हजारांचे करण्यात आले. आता शासनाच्या आदेशानुसार त्या डॉक्‍टरांना आता दरमहा ३० हजारांचेच मानधन दिले जाईल, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहरातील रुग्णांसाठी वाडीया हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर तर पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. दोन-तीन दिवसांत ते सुरु होईल. त्यासाठी डॉक्‍टरांची नियुक्‍ती केली जात आहे.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी,

महापालिका, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com