मोहोळ येथे बनावट विद्राव्य खत तयार करून विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake fertilizer seller arrested by Solapur police mohol

मोहोळ येथे बनावट विद्राव्य खत तयार करून विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मोहोळ : बनावट विद्राव्य खते तयार करणे व ती विक्री केल्याप्रकरणी मोहोळ येथील दोघा जणाविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयीतांना अटक करून त्यांच्याकडून बनावट खत व इतर साहित्य असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. वैभव विजय काळे,(मोहोळ) राहुल शेंडगे (ढोक बाभुळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ येथील एका शेतकऱ्याने मोहोळ येथे 12/ 61/0 हे बनावट खत विक्री होत असल्याची तक्रार पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे यांच्याकडे केली होती. त्याने स्वतः दोन बॅगा खरेदी केल्याचेही सांगितले. विद्राव्य खताच्या बॅगा पुरवठा करणारा हा मोहोळ येथील एका ट्रॅक्टर शोरूम मध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी अशोक बारकू पवार यांनी मोहोळ येथे येऊन पोलिसांना मदत मागितली. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे व अशोक मोरे हे पथक सदर ट्रॅक्टर शोरूम मध्ये गेले. त्या ठिकाणाहून राहुल शेंडगे याला ताब्यात घेतले व त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने सदरचा खत हा वैभव विजय काळे रा मोहोळ यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने त्यांचा मोर्चा वैभव काळे यांच्याकडे वळविला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता,त्याने मोहोळ येथील नाईकवाडी वस्ती मध्ये पोल्ट्री फार्म च्या बाजूच्या पत्रा शेडमध्ये बनावट खत तयार करून त्याचे पॅकिंग करत असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलीस पथक व कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी केले असता त्या ठिकाणा वरून 32 हजार रुपये किमतीच्या 50 किलोच्या विद्राव्य खताच्या चार बॅगा, 11 हजार रुपयांची बॅगा सील करण्याची दोन यंत्रे, साडेसहा हजार रुपयाचा वजन काटा व साडे सहाशे रुपयाचे दोऱ्याचे पाच रोल असा एकूण 50 हजार 150 रुपयाचा माल ताब्यात घेतला. संशयतानी "यारा" या कंपनीच्या 12/ 61/0 या विद्राव्य खताची नक्कल करून ती बॅगेत भरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले, तसेच या खत विक्रीचे कुठलेही रेकॉर्ड ठेवले नाही. म्हणून खत नियंत्रण आदेशान्वये त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे हे करीत आहेत.

Web Title: Fake Fertilizer Seller Arrested By Solapur Police Mohol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..