ई-व्हेईकल्ससाठी फास्ट चार्जिंग सेंटरची गरज

पेट्रोलपंपावर चार्जिंग सुविधा सुरू करण्याची आवश्‍यकता
fast charging center for e vehicles solapur
fast charging center for e vehicles solapursakal

सोलापूर : बाजारात ई- व्हेईकल्सची उपलब्धता वाढत चालली असून प्रत्यक्षात एकही फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू झालेले नाही. महापालिकेने एकाठिकाणी स्वतःचे चार्जर लावण्यासाठी एक चार्जिंग सेंटर सुरू केले आहे. प्रत्यक्षात फास्ट रिचार्जिंग स्टेशनची गरज निर्माण झाली आहे. बाजारात ई-व्हेईकलची विक्री वाढू लागली आहे. त्यामध्ये २५ किमी प्रतितासापेक्षा वेग अधिक असलेल्या वाहनांची आरटीओकडे नोंदणी केली जाते. तसेच त्यापेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांची विक्री अधिक असल्याने त्याची नोंद आरटीओकडे होत नाही. पण अजूनही ई-व्हेईकलच्या संदर्भात चार्जिंग सुविधा गरजेच्या प्रमाणात उपलब्ध नाही.

पेट्रोलपंपावर फास्ट चार्जिग सुविधा लवकरच सुरू होणार असे सांगितले जात होते. पण सध्या तरी त्याबाबत अद्याप कोणतीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. महापालिकेने शहरात दोनठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. पण ते साधे इलेक्‍ट्रिक पॉईंट असून, वाहनचालकांनी स्वतःचे चार्जर नेऊन त्यांना तेथे वाहन चार्जिंगला लावता येईल. पण ही सुविधा अपुरी आहे. उच्च दाबाच्या विजेच्या मदतीने फास्ट चार्जिंग झाल्याशिवाय ई-व्हेईकल्सधारकांना त्याचा लाभ मिळणार नाही.

ई-व्हेईकल्सच्या चार्जिंग गरजा

  • सर्वत्र फास्ट चार्जिंग सुविधा समान हवी

  • किमान शंभर किमी अंतरावर चार्जिंग सेंटर हवे

  • पेट्रोल पंप वाहनधारकांसाठी सर्वाधिक सुविधाजनक

  • पेट्रोलपंपावर चार्जिंग सेंटर अधिक सुरक्षित

  • फास्ट चार्जिंग सुविधांची उभारणी तांत्रिकदृष्ट्या सोयीची

सध्या ई-व्हेईकल्सची विक्री होत आहे. शहरातील सर्व भागात फास्ट चार्जिंग असण्याची गरज आहे. या पध्दतीचे चार्जिंग सेंटर सुरू व्हावेत तरच ग्राहकांना लवकर सेवा मिळेल.

- बसवराज येरनाळे, राज ऑटोमोबाईल्स, सोलापूर

मी दोन ई- व्हेईकल्स वापरतो. साडेतीन रुपयांच्या चार्जिंगमध्ये सव्वाशे किमी वाहन चालवता येते. तसेच ट्युबलेस टायर असल्याने गाडी पंक्‍चरही होत नाही. फास्ट चार्जिंगची सुविधा असावी, म्हणजे लांबचा प्रवास करणे शक्‍य होईल.

- ज्ञानेश्‍वर केंकडे, फलटण गल्ली, सोलापूर

सध्या पेट्रोलपंपावर ई-व्हेईकल्सच्या बाबतीत फास्ट चार्जिंग सेवा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना आल्यावर याबाबत विचार केला जाऊ शकेल.

- संजय चाटे-देशमुख, अध्यक्ष, पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशन, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com