
Solapur Crime News : हत्याकांडातील आरोपीला कडक व जास्तीची शिक्षा होण्यासाठी गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; समाधान आवताडे
भोसे : तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडाची घटना ही खरोखरच मानवतेच्या धर्माला आणि सामाजिक एकरूपतेला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपीला कडक व जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी तिहेरी हत्याकांडाला बळी ठरलेल्या माळी परिवाराचे सांतवन्नपर भेटी प्रसंगी बोलताना सांगितले.
आमदार समाधान आवताडे यांनी या दुःखद प्रसंगी सहवेदना व्यक्त करीत समस्त माळी कुटुंबियास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली.सुसंस्कृत भारतीय मानवतेच्या आचरणामध्ये अशा प्रकारच्या अमानुष आणि निंदनीय घटनेचा आ. आवताडे यांनी तीव्र शब्दात निषेध करून संताप व्यक्त केला.
संपूर्ण घटनेचा सखोलपणे छडा लागून पीडित माळी कुटुंबास योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आ.आवताडे यांनी सांगितले.
नंदेश्वर ग्रामस्थानी सदर घटनेनंतर निषेध म्हणून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी याकरता गावातील सर्व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती संपूर्ण गाव पूर्ण बंद ठेवला होता.
गावात ग्रामसभेचे आयोजन करून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली आमदार समाधान आवताडे यांनी मध्यस्थी करून आरोपीवर् लवकरात लवकर क डक कारवाई करून माळी कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिलेनंतर व्यापारी वर्गाने गावातील बाजारपेठ सुरु केली.
यावेळी .प्रा.येताळा भगत सर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, लक्ष्मण नरुटे, . दत्ताभाऊ साबणे, पै.अशोक चौँडे .धनाजी गडदे, आकाश डांगे, .दादा दोलतोडे, आप्पा रामगडे, भारत गरंडे, दामाजी बंडगर आदी जण उपस्थित होते.