वेटिंगवरील मुलांना मोफत प्रवेशाची लॉटरी! जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ४९० जागा रिक्त

जिल्ह्यातील ३०६ नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या एक हजार ८८० मुलांना (२५ टक्के) मोफत प्रवेश दिला जात आहे. पण, पाहिजे ती शाळा न मिळाल्याने ४९० पालकांनी मुलांचा प्रवेश घेतलाच नाही.
rte.jpeg
rte.jpegsakal

सोलापूर : जिल्ह्यातील ३०६ नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या एक हजार ८८० मुलांना (२५ टक्के) मोफत प्रवेश दिला जात आहे. पण, पाहिजे ती शाळा न मिळाल्याने ४९० पालकांनी मुलांचा प्रवेश घेतलाच नाही. त्यामुळे त्या जागांवर आता प्रतीक्षेतील मुलांना संधी मिळणार आहे.

rte.jpeg
विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक

आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेणे मागासवर्गीय प्रवर्गातील पालकांना शक्य होत नाही. त्यांच्या मुलांना तशा शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा म्हणून ‘आरटीई’तून २५ टक्के प्रवेशाची अट घालण्यात आली. त्या शाळेच्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागांवर आरटीईतून प्रवेश देणे बंधनकारक आहे. दरवर्षी आरटीईच्या एकूण जागांच्या तुलनेत तिप्पट-चौपट अर्ज येतात. पण, पाहिजे त्या शाळांमध्ये सर्वांनाच प्रवेश मिळतो, असे होत नाही. त्यामुळे जागा रिक्त राहतात आणि प्रतीक्षा यादी प्रसिध्द करावी लागते. अनेकांसाठी ही प्रतीक्षा यादी लॉटरी ठरते. यंदा ४९० जागा शिल्लक राहिल्या आहेत. एक हजार ८८० पैकी एक हजार ३७६ मुलांनी प्रवेश घेतला आहे. तर १४ जणांचे प्रवेश नाकारण्यात आले असून त्यामागे कागदपत्रांची पुर्तता न केल्याचे कारण आहे. १३ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. तत्पूर्वी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पहिल्या यादीतील सर्वांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर राज्य स्तरावरून प्रतीक्षा यादी प्रसिध्द होते. दरम्यान, ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या मुलांकडून संबंधित शाळांनी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

rte.jpeg
ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत

तालुकानिहाय रिक्त जागा
अक्कलकोट २८, बार्शी ६२, करमाळा १३, माढा ५०, माळशिरस ५१, मंगळवेढा १९, मोहोळ ५, पंढरपूर ८३, सांगोला २३, उत्तर सोलापूर ४४, दक्षिण सोलापूर ३०, सोलापूर शहर ८२ अशा एकूण ४९० जागा रिक्त आहेत.

rte.jpeg
विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर

पालकांनो, मेसेजवर लक्ष ठेवा
सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत पहिलीतील मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित इंग्रजी शाळांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील (प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के) मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेश मिळाल्यानंतर त्याच शाळेत संबंधित मुलाला आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळते. आता पहिल्या यादीत नंबर लागलेला असतानाही ४९० मुलांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे आता बुधवार-गुरुवारी पहिली प्रतीक्षा यादी प्रसिध्द होईल. पालकांना त्यासंबंधीचा मेसेज जाणार असून पालकांनी मेसेज आल्यानंतर त्या शाळेत जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com