मुलींना हवा आहे मुलांसारखाच गणवेश, सोलापूरच्या गावात क्रांतीकारी निर्णय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanskruti Patil

जग बदलले, मुलींनी सगळी क्षेत्रे पादाक्रांत केली. मात्र, कित्येक वर्षांपासून आम्हाला शाळेत अमूकच पारंपारिक गणवेश का दिला जात आहे. आम्हालादेखील मुलांप्रमणेच गणवेश हवा आहे.

मुलींना हवा आहे मुलांसारखाच गणवेश, सोलापूरच्या गावात क्रांतीकारी निर्णय!

मोडनिंब - आम्‍हालापण मुलांसारखाच गणवेश हवा, अशी मागणी करणाऱ्या मुलींना तत्‍काळ मुलांप्रमाणे पँटशर्ट असा गणवेश उपलब्ध करून देण्याचा अनोखा आणि क्रांतीकारी निर्णय बावी (ता. माढा) येथील जिल्‍हा परिषद शाळेने पालकांची संमतीद्वारे एकमताने ठरावाद्वारे घेतला.

जग बदलले, मुलींनी सगळी क्षेत्रे पादाक्रांत केली. मात्र, कित्येक वर्षांपासून आम्हाला शाळेत अमूकच पारंपारिक गणवेश का दिला जात आहे. आम्हालादेखील मुलांप्रमणेच गणवेश हवा आहे, अशी मागणी बावी जिल्हा परिषदेच्या चिमुरड्या मुलींनी केली. त्‍याची दखल शाळा व्यवस्थापन समितीला घ्यावीच लागली. तत्काळ मुलींच्या मागणीनुसार मुलांप्रमाणेच पँटशर्ट असा गणवेश घेण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. शाळेने तत्काळ पालकांची संमतीपत्रे मागवून घेतली. त्यास पालकांनीदेखील एकमताने प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलींच्या गणवेश निवडीचे स्वातंत्र्य त्या-त्या शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले. वास्तविक, बावी हे पारंपारिक प्रथा, रूढी जपणारे व मोळ्यातील गाव आहे. मात्र,याच गावातील नव्या पिढीने आपल्या लेकींना स्‍त्री-पुरुष समानतेचा स्वातंत्र्य देऊन समाजासमोर एक आदर्श उभा केला. जिल्ह्यासाठी आदर्श बाब ठरली आहे.

या बैठकीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र मोरे, उपाध्यक्ष अरुण मोरे, नंदकुमार मोरे, सुजाता क्षीरसागर, सारिका जगताप, महादेव जाधव, जयंत पाटील, मुक्ताबाई मोरे, शीतल मोरे, कर्णवीर नागटिळक, सारिका पाटोळे, राणी भोसले, श्रीकांत ठोंबरे, श्रीमंतराव देशमुख, हनुमंत इंगळे, शरद पवार, मुख्याध्यापक योगेशकुमार भांगे उपस्थित होते.

मुलामुलींमध्ये भेदभाव करू नये, असे शाळेत व घरी सांगितले जाते. मग आमच्या गणवेशामध्येच फरक का? बाहेर फिरताना मुली जीन्स टॉप वापरतात. मग शाळेत का नाही? आम्हालाही पँटशर्ट गणवेश मिळाल्यास शाळेत वावरताना सहजता येईल.

- संस्कृती जयंत पाटील, विद्यार्थिनी.

Web Title: Girls Boys School Uniform Bavi Village Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top