'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थीती

हवामानाच्या अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व गेल्या पंधरा दिवसापासून चे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे दर कोसळले असून, 'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' अशी म्हणण्याची वेळ मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
Grapes
Grapes esakal
Summary

हवामानाच्या अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व गेल्या पंधरा दिवसापासून चे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे दर कोसळले असून, 'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' अशी म्हणण्याची वेळ मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

मोहोळ - हवामानाच्या (Weather) अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व गेल्या पंधरा दिवसापासून चे ढगाळ वातावरण (Atmosphere) यामुळे द्राक्षांचे दर (Grapes Rate) कोसळले असून, 'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' अशी म्हणण्याची वेळ मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर (Farmer) आली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 'पोती' ओळखल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मोहोळ तालुका तसा रब्बीचा. परंतु भीमा, सीना या नद्या, आष्टी तलाव, आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी विविध बँकाची लाखो रुपयांचे कर्ज काढून जलवाहिन्या टाकून आपल्या शेतापर्यंत पाणी आणले आहे. पाणी आल्यामुळे मुख्य व नगदी पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. मात्र ऊस गाळपास जाताना गाव पातळीवरील राजकारण वेळेत न मिळणारे पैसे यामुळे वैतागून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे कानाडोळा केला. दरम्यान, ऊसानंतर नगदी पीक म्हणून द्राक्षाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. मोहोळ तालुक्यात सुमारे साडेपाच हजार एकरावर द्राक्षाची लागवड झाली आहे. मात्र द्राक्षाला ही आता बुरे दिन आले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षासह डाळिंब, पेरू या पिकावर विविध किडी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा उतरण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. दराच्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांनी द्राक्षे उत्तम प्रकारे पिकवली आहेत. पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणावरून व्यापारी येतात व सौदा करून द्राक्षे काढून घेऊन जातात, अशी पद्धत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून वेगवेगळ्या हवामान शास्त्रज्ञांनी वातावरणातील बदल सांगितल्याने व्यापाऱ्यांचे त्याकडे बारीक लक्ष आहे. हवामान अंदाज खराब सांगितला तर व्यापार करून सुद्धा व्यापारी माल न्यावयास येत नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. इतर वेळी 40 ते 45 रुपये किलो दराने द्राक्षे घेणारे व्यापारी केवळ 25 ते 28 रुपये किलो दराने द्राक्ष मागत आहेत, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. बागेतून द्राक्षे काढताना एक नंबरची काढतात, बाकीचा तसाच ठेवतात त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यात मोठा तोटा होत आहे. एका एका शेतकऱ्याची किमान पाच ते दहा एकरा पर्यंत द्राक्ष बागांची लागवड केली आहे. पाऊस व गारपीट झाली तर काय करावे याचे या भीतीने शेतकरी व्यापारी कसा मागेल त्या दराने द्राक्ष त्याच्या पदरात टाकतोय.

शेतकऱ्या पेक्षा एजंट मोठे झाले आहेत. गावपातळीवर व्यापार्‍याला जो एजंट बागा दाखवतो त्याला किलोला एक रुपया कमिशन दिले जाते. जो व्यवहारात मध्यस्थी करून व्यापाऱ्याला द्राक्षाचे फोटो पाठवितो त्याला किलोला दोन-तीन रुपये कमिशन दिले जाते. मात्र हा सर्व बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यावरच आहे. यात गाव पातळीवरील एजंट मालामाल झाले आहेत, ते अनेक सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत.

खराब वातावरणामुळे व्यापारी सौदा करून सुद्धा माल नेईल की नाही याची खात्री नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी व कोणते पिक करावे हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

- अजीत भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com