Half of Maharashtra will remain locked down till May
Half of Maharashtra will remain locked down till May

मोठी ब्रेकिंग! अर्धा महाराष्ट्र मेपर्यंत राहणार लॉकडाउन... 'या' जिल्ह्यांचा समावेश

सोलापूर : राज्यातील गडचिरोली, भंडारा व वर्धा हे तीन जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून ऑरेंज झोनमध्ये राज्यातील 14 जिल्हे आहेत. याठिकाणी मागील काही दिवसांत नवे रुग्ण आढळले नसून रुग्ण संख्याही 1 ते 11 पर्यंतच आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता या जिल्ह्यांमधील लॉकडाउन शिथील करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तर उर्वरित 18 जिल्ह्यांमधील लॉकडाउन मात्र आणखी काही दिवस तसाच ठेवला जाणार आहे. रविवारी (ता. 26) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे संकेत दिले.
कोरोनाचे वैश्विक संकट लवकर दूर व्हावे, विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मोदी सरकारने 22 मार्च ते 14 एप्रिल पहिला लॉकडाउन जाहीर केला. मात्र, विषाणूला रोखण्यात अपेक्षित यश न मिळाल्याने लॉकडाउनचा टप्पा 3 मेपर्यंत वाढविला. या काळात काही जिल्ह्यांपासून विषाणूला रोखता आले तर बहुतांश जिल्ह्यांमधील विषाणूची साखळी खंडीत करण्यात सरकारला यश मिळाले. त्यानुसार लॉकडाउन शिथिल करून उद्योग, व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, पालघर, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर येथे रुग्ण काही दिवसांतच वाढले. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय पथकाच्या माध्यमातून रेड झोनमधील काही जिल्ह्यांची पाहणी झाली असून या पथकाचा अहवाल मोदी सरकारला सादर केला

जाणार आहे. दरम्यान, नगर, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, बुलढाणा, अकोला, अमरावती हे आठ जिल्हेही रेड झोनमध्येच आहेत; परंतु रुग्ण संख्या 38 पेक्षा जास्त नाही. दुसरीकडे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत (ता.26) सुमारे आठ हजार कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण सापडलेला परिसर सील केल्याने त्या परिसरातील कामगार, व्यावसायिकांना सहजासहजी घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांमधील लॉकडाउन आणखी किमान 15 ते 20 दिवस तसेच ठेवले जावू शकते, असे महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर उर्वरित 17 जिल्ह्यांमधील विषाणूची साखळी खंडीत होऊ लागली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नांदेड, बीड, परभणी, जालना, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदूरबार, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 27) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सवांद साधला. त्यानुसार ग्रीन, ऑरेंज व रेड झोनमधील जिल्ह्यांबाबत गुरुवारपर्यंत निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता रेल्वे व विमानतळ विकास प्राधिकरणासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी
रेल्वे, विमानांचे बुकिंग अद्यापही लॉकच

राज्यातील चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नांदेड, बीड, परभणी, जालना, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदूरबार, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली, लातूर या 14 जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत (ता. 26) केवळ 59 रुग्ण आढळले असून मागील काही दिवसांत एकाही रुग्णाची त्यात भर पडलेली नाही. तर गडचिरोली, भंडारा व वर्धा हे तीन जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नसून उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये आठ हजारांहून रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकिट बुकिंग 31 मेपर्यंत तरी सुरू होणार नाही, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले. तर देशातील लॉकडाउनची मुदत सहा दिवस राहिला असूनही अद्याप रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू झाले नसल्याचे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे म्हणाले. राज्य सरकारचे अद्याप काहीच आदेश प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना काहीच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर रेड झोनमधील जिल्ह्यातील लॉकडाउन आणखी काही दिवस वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे...

  • विमान, रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांचे अद्याप सुरू नाही बुकिंग; 22 ते 24 मेदरम्यान होणाऱ्या एमपीएससी, सहकारी संस्थांच्या पदविका व प्रमाणपत्र परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी ढकलल्या पुढे
  • कोरोनाच्या विषाणूपासून राज्यातील गडचिरोली, भंडारा, वर्धा हे तीन जिल्हे अद्यापही चार हात लांबच
  • चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नांदेड, बीड, परभणी, जालना, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदूरबार, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली, लातूर या 14 जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत (ता. 26) केवळ 59 रुग्ण आढळले
  • 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये सुमारे आठ हजार कोरोनाबधित रुग्ण;  17 जिल्ह्यांमधील विषाणूची साखळी होतेय खंडीत, रुग्ण बरे होण्याचे वाढले प्रमाण
  • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनची मुदत राहिली सहा दिवस; मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वाढताहेत कोरोनाबाधित
  • नगर, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, बुलढाणा, अकोला, अमरावती हे आठ जिल्हेही रेड झोनमध्येच; केंद्रीय आरोग्य पथकाचा मोदी सरकारला सादर होणार लवकरच अहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com