मंगळवेढ्यात मरण नको रे बाबा नातेवाईकांचा सवाल

तीन आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते...
health system issue faced by relatives during the autopsy  solapur
health system issue faced by relatives during the autopsy solapursakal

मंगळवेढा : तालुक्यात अपघाती घटनेनंतर शवविच्छेदन करताना कामकाजाच्या हद्दीवरून आरोग्य यंत्रणेकडून होणारा त्रास लक्षात घेता नातेवाईकतून मंगळवेढ्यात मरण नको रे बाबा अशी अवस्था आरोग्य यंत्रणेच्या चालढकल करण्याच्या बाबतीत बोलले जाऊ लागले. मरवडे बोराळे आंधळगाव या तीन आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागते परंतु ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला दिल्या जाणाय्रा वैद्यकीय सुविधा विचारात विचारात घेता या ग्रामीण भागाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे गावेही नदीकाठची तर मरवडे आणि आंधळगाव हे ठिकाण महामार्गावरील असल्यामुळे वैद्यकीय सुविधा सतर्क ठेवण्याची आवश्यकता असताना दुर्लक्ष केले.शवविच्छेदनसाठी स्वतंत्र खोलीच्या मागणीवर दैनिक सकाळने यापूर्वी आवाज उठवला. परंतु जि. प.च्या आरोग्य विभागाने आरोग्य सभापती तालुक्यातील असताना देखील सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. आरोग्य विभाग दरवर्षी कोट्यवधीचा तालुक्यातील इतर कामासाठी खर्च करताना या महत्त्वाच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले.

26 फेब्रुवारी 2021 ला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत देखील भगीरथ भालके व जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांनी या आरोग्य केंद्रा अंतर्गत येत गावात पोस्टमार्टम करण्यावरून होणाऱ्या अडचणी बाबतचा प्रश्न उपस्थित केला त्यानंतरही आरोग्य खात्याने या प्रमुख प्रश्नाला दुर्लक्षित केले. यापूर्वी माचणूर येथील 70 वर्षीय बेवारस वृद्धाचा सकाळी मृत्यू झाला,बोराळेच्या वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय कामाच्या निमित्ताने सोलापूरला गेल्यामुळे त्याचे शवविच्छेदन कोणी करायचे यावरून हा मृतदेह बराच काळ ताटकळत राहिला. सोलापूर येथील आंबेडकर जयंतीची मिरवणूक उरकून गावाकडे जाणाऱ्या डीजेच्या वाहनाचा चाळीस धोंडा येथे अपघात झाला.

मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी सायंकाळ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. जालिहाळ येथील 22 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू सकाळी सहा वाजता झाला तिचे शवविच्छेदन करण्यासाठी अशिक्षित नातेवाईकांना सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या गंभीर प्रकाराची नागरिकानी आ. समाधान आवताडे तक्रार केल्यानंतर शेवटी त्यानी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना शवविच्छेदन करण्यास भाग पाडले. बहुतांश ठिकाणी आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

मयत विवाहितेचे शवविच्छेदन विचारण्यासाठी दमछाक झाली. ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांनी तू तू मै मै करत तब्बल आठ तास शवविच्छेदन चा खेळ मांडला, सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील ज्या त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसे न केल्यास नातेवाईकाच्या रोषाची जबाबदार घ्यावी लागेल.

- हैदर केंगार,सामाजिक कार्यकर्ते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com