esakal | अतिवृष्टीने प्रचंड नुकसान ; पंचनाम्यासाठी तलाठी उतरले शेतात | Solpaur
sakal

बोलून बातमी शोधा

solpaur

अतिवृष्टीने प्रचंड नुकसान ; पंचनाम्यासाठी तलाठी उतरले शेतात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपूर्वी पासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडाळा मंडलामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणचे नुकसान सर्वाधिक आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आज पासून सुरू झाले आहेत.

ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी या तीन स्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून हे पंचनामे सुरू झाले आहेत. तलाठी प्रत्येक शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत आहे. त्या पंचनाम्यावर तिघांच्या स्वाक्षरी आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांकडून जबाबही लिहून घेतला जात आहे. नुकसान झालेल्या पिकाचे छायाचित्र त्या पंचनाम्या सोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

''अतिवृष्टी व महापूर झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार आजपासून पंचनामे सुरू झाले आहेत. वडाळा मंडलामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाणही जास्त आहे. एक-दोन दिवसांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण होऊन नुकसानी बाबतचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. फळबागा व इतर पिकांचे झालेले नुकसान फोटोसह पंचनाम्यात सोबत देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत''.

जयवंत पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर.

loading image
go to top