सलाईनच्या अवस्थेत 'तिने' दिला बारावीचा पेपर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prerana babar

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता 12 ची परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी कु. प्रेरणा बाबर या रायगांव (ता. करमाळा) येथिल विद्यार्थिनीने ॲम्बुलन्समधुन परीक्षा येत रसायनशास्त्राचा पेपर दिला आहे.

HSC Exam : सलाईनच्या अवस्थेत 'तिने' दिला बारावीचा पेपर

करमाळा - करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता 12 ची परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी कु. प्रेरणा बाबर या रायगांव (ता. करमाळा) येथिल विद्यार्थिनीने ॲम्बुलन्समधुन परीक्षा येत रसायनशास्त्राचा पेपर दिला आहे.

विशेष म्हणजे नाकाला ऑक्सिजनची नळी व हाताला सलाई लावुन या विद्यार्थीनीने पेपर दिला आहे.

करमाळा येथील खाजगी हॉस्पिटल मधून तिला पेपर देण्यासाठी ॲम्बुलन्स मधून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर आणण्यात आले. महाविद्यालयात अचानक ॲम्बुलन्स आल्याने नेमका हा काय प्रकार आहे हे परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे थोड्या वेळ विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाख यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना ॲम्बुलन्स कशासाठी आली आहे याबाबत कल्पना दिली.

केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी या विद्यार्थिनीची बैठक व्यवस्था केली. पेपर सुरू असताना डॉ. रविकिरण पवार व डॉ. कविता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीचारीका कु. राजश्री पाटील यांनी उपचार सुरु ठेवले.

कु. प्रेरणा बाबर या विद्यार्थ्यीनीने आजारी अवस्थेत परीक्षा देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सहकेंद्र संचालक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. सुवर्णा कांबळे पर्यक्षेकांनी सहकार्य व उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.

हा पेपर सुरु असताना डॉ. रविकिरण पवार, डॉ. कविता कांबळे, डॉ. अमोल घाडगे, डॉ. महेश अभंग, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. वर्षा करंजकर, डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिचारिका राजश्री पाटील यांनी उपचार चालू ठेवले. पेपर संपल्यानंतर पुन्हा प्रेरणा बाबर हिला उपचारासाठी येथिल खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.