विशाल फटेला कोर्टात उशिरा का हजर केले? जाणून घ्या नेमके कारण

Solapur Barshi Vishal Fateh
Solapur Barshi Vishal Fateh sakal

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतणवणूक करुन ज्यादा पैशांचे अमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेतील विशाल फटेला बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फटेच्या वकिलांचा युक्‍तीवाद अमान्य करीत न्यायालयाने पुढील सखोल चौकशीसाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Solapur Barshi Vishal Fateh
अत्यंत दिलासादायक! मुंबईत दिवसभरात सात हजारपेक्षाही कमी रुग्ण

दरम्यान, सोमवारी (ता. 17) रात्री साडेआठच्या सुमारास फटे हा स्वत: पोलिस अधीक्षकांसमोर हजर झाला होता. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांनतर त्याला तालुका पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला बार्शीला हलविण्यात आले. बार्शी पोलिसांत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने त्याला बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, अटकेनंतर 24 तासांत त्याला कधीही न्यायालयात हजर करणे बंधनकारक होते. पोलिसांनी विलंब होणार नाही, याची खबरदारी घेत त्याला सायंकाळी पाचनंतर कोर्टात दाखल केले. सकाळी अथवा दुपारच्या सत्रात न्यायालयाच्या आवारात बघ्यांची, तक्रारदारांची व त्याच्याशी संबंधित व्यक्तीची मोठी गर्दी होऊ शकते, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याला उशिराने न्यायालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Solapur Barshi Vishal Fateh
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत आढळला 'म्युकरमायकोसिस'चा पहिला रुग्ण

सोयीच्या ठिकाणी पुढील तपास...

बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने विशाल फटे याला सर्वसामान्यांना ज्यादा पैशांचे अमिष देऊन स्वत:च्या तीन कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवायला भाग पाडले. त्यानंतर काही दिवस त्यांना वाढीव फायदाही दिला. मात्र, त्यानंतर त्याने जिल्ह्यातील जवळपास 50 जणांचे साडेआठरा कोटी रुपयांची रक्‍कम परत दिलीच नाही. त्यामुळे दीपक आंबुरे यांनी त्याच्याविरुध्द फिर्याद दिली आणि तो पत्नी व मुलीसह पसार झाला. विविध ठिकाणी राहिल्यानंतर त्याचे मत परिवर्तन झाले आणि त्याने व्हिडिओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना काहीतरी सांगण्याचा भावनिक प्रयत्न केला. पोलिसांत आपण स्वत:हून हजर राहणार असल्याचेही त्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले.

Solapur Barshi Vishal Fateh
Pune | मेट्रोपर्यंत जाण्यासाठीच्या सायकलींचे पुण्यात आगमन

पोलिसांसह तक्रारदारांना त्याच्याबद्दल विश्‍वास वाटत नव्हता. परंतु, तो सोमवारी स्वत:हून पोलिसांना शरण आला आणि पोलिसांनी त्याला आज (मंगळवारी) न्यायालयात हजर केले. आता त्याला बार्शी पोलिस ठाण्यात ठेवून चौकशी करायची की तालुका पोलिस ठाण्यात की आणखी कुठे, त्याबद्दल उद्या (बुधवारी) निर्णयाची शक्‍यता आहे. सोयीच्या ठिकाणी त्याची सखोल चौकशी होईल, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. फसवणूक केलेली रक्‍कम त्याने कुठे गुंतवली की कोणाला दिली, इतके दिवस सुरळीत व्यवहार सांभाळणारा फटे कोणोमुळे अडचणीत आला, त्याचे नेमके कारण काय, यासह अन्य बाबींचा सखोल तपास दहा दिवसांत केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com