वाचा... अक्‍कलकोट शहरातील दुकानांबाबत महत्त्वाचा निर्णय 

Important decision regarding shops in Akkalkot city
Important decision regarding shops in Akkalkot city

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्‍कलकोट शहरात 18 ते 25 मे दरम्यान जीवनावश्‍यक, कृषी व आरोग्यविषयक दुकाने वगळता सध्या चालू असलेल्या नियमानुसार व्यापाऱ्यांनी अन्य दुकाने बंद ठेवावीत, या नगरपालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन 25 मे पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने आज घेतला. 
अक्कलकोट नगरपालिकेत नगरपालिका पदाधिकारी, अधिकारी, पोलिस प्रशासन व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीस नगराध्यक्षा शोभा खेडगी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, सद्दाम शेरीकर, विरोधी पक्षनेते अशपाक बळरोगी, मुख्याधिकारी आशा राऊत, पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, अप्पू उन्नद, विपुल दोशी, महिंद्रकर आदींसह व्यापारी उपस्थित होते. सध्या पुणे, मुंबईसह राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक तालुक्‍यात आलेले आहेत. जर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली तर ते मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करतील. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. कारण मागील वेळेस व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यावर त्या दुकानात प्रचंड गर्दी झाल्यामुळे 17 मे पर्यंत दुकाने बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी स्वतःहून घेतला होता. त्यामुळे आज व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता आज नगरपालिकेत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सर्व व्यापाऱ्यांना 25 मे पर्यंत जीवनावश्‍यक, कृषी व वैद्यकीय दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन नगरपालिकेने केले. त्यास व्यापाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत 25 मे पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com