बापानेच केला मुलीवर अत्याचार; गरोदर राहिल्याचं समजताच लावलं लग्न

पंढरपूरमध्ये (Pandharpur) अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) तिच्याच पित्याने (Father) लैंगिक अत्याचार (Sexually abused) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Girl sexually abused by his father in Pandharpur
Girl sexually abused by his father in Pandharpure sakal

बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील एका गावात घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl) तिच्याच जन्मदात्या पित्याने (father) लैंगिक अत्याचार (sexually abused) केल्याचं उघड झालंय. स्वतःच्या मुलीशी दुष्कृत्य करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक (Arrested by Police) केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पिडीत अल्पवयीन मुलीवर तिचाच बाप अनेक महिन्यांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. या अत्याचारानंतर पिडीता गर्भवती (Pregnant) राहिली. मुलगी गर्भवती राहिल्याचं लक्षात आल्यामुळे बापाने पुण्यातील (Pun) एका तरूणासोबत तिचं लग्न (Marriage) लावलं. त्यानेही पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. (In Pandharpur, a minor girl was sexually abused by her father)

Girl sexually abused by his father in Pandharpur
अपहरण करुन 11 वर्षे बलात्कार; प्रकरण असं आलं उजेडात

दरम्यान काही दिवसानंतर पिडीत मुलगी गरोदर असल्याचे त्याला समजलं. त्यानंतर त्याने तिला पुन्हा तिच्या गावी बापाच्या घरी आणून सोडलं.

दोन दिवसांपूर्वी पिडीत गरोदर अल्पवयीन मुलीची प्रसुती (Delivery) झाली. डॉक्टरांनी तिची विचारपूस केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Girl sexually abused by his father in Pandharpur
फेसबुक फ्रेंडकडून विवाहिता गर्भवती; नागपूर, जळगावात केला बलात्कार

पोलिसांनी पिडीतेचा जबाब घेतल्यानंतर आरोपी नराधम पित्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Pandharpur Police Station) बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत (Child Sexual Abuse Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com