सोलापूर जिल्ह्यात वाढला बिबट्याचा अधिवास!

बिबट्या व मानव यांच्यात संघर्षाबद्दल वन विभाग व साखर कारखाने यांनी पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्‍यक आहे.
leopards
leopardsesakal
Summary

बिबट्या व मानव यांच्यात संघर्षाबद्दल वन विभाग व साखर कारखाने यांनी पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्‍यक आहे.

सोलापूर : जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये बिबट्याचा (Leopards)वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने डल्ला मारला असून गतवर्षी करमाळा (Karmala) तालुक्‍यात तीन तर मोहोळ (Mohol) तालुक्‍यात एक जीवितहानीदेखील झाली आहे. बिबट्या व मानव यांच्यात संघर्षाबद्दल वन विभाग (Forest Department) व साखर कारखाने (Sugar Factory) यांनी पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्‍यक आहे.

leopards
सोलापूर : पोस्टात फास्टटॅगसह ७२ सेवा उपलब्ध

सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उत्पादन (Sugar production) करणारा जिल्हा बनला आहे. जिल्ह्यात उसाचे वाढते क्षेत्र बिबट्याचा रहिवास वाढण्यास कारणीभूत आहे. यामुळे वाढत्या ऊस क्षेत्राबरोबर बिबट्याचा वावरही वाढत राहणार आहे. यासाठी बिबट्या व मानव संघर्ष आता यापुढे नेहमीचा प्रश्‍न असणार आहे. यासाठी शेतकरी कामगार (Farmer workers)यांना बिबट्यासमवेत जगण्याचे प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. प्रत्येक बिबट्या हा नरभक्ष्यक नसतो. याउलट तो अत्यंत लाजाळू व शक्‍यतो रात्री फिरणारा प्राणी आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी बिबट्याला उपद्रवी होऊ न देणे हाच उपाय आहे. शेतवस्त्यावरील गुरे, वासरे बंदिस्त जागेत ठेवणे. वस्तीजवळ किमान पन्नास फुटापर्यंत कोणतीही उंच पिके न घेणे. रात्री मोठा प्रकाश देणाऱ्या दिव्यांची व्यवस्था करणे. रात्रीअपरात्री लहान मुले महिला यांनी बाहेर न पडणे, आदी विविध उपाययोजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

सध्या सर्वच साखर कारखाने (Sugar Factory)सुरू आहेत. येत्या तीन- चार महिन्यांत शिवारातील ऊस कारखान्याला गेल्यानंतर पुन्हा बिबट्याचा वावर वाढणार आहे. यामुळे वन विभाग (Forest Department) व साखर कारखाने (Sugar Factory) यांनी एकत्रित येऊन परिसरातील शेतकरी व कामगार यांना प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. याबाबत बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करून लोकांच्या मनातील भीती दूर करणे आवश्‍यक आहे.

leopards
सोलापूर : गुलाबाची शेती करून एकरी तीन लाखांचे उत्पन्न

बिबट्याचा वावर जिल्ह्यात निश्‍चितच आहे. उसाच्या पट्ट्यातच तो जादा आहे. बिबट्या रेस्क्‍यू करण्याचे प्रशिक्षण वन कर्मचाऱ्यांना दिलेले आहे. वन विभागाकडून जनजागृतीचे प्रयत्नही सुरू आहेत.

- धैर्यशील पाटील, उप वनसंरक्षक, सोलापूर

जन्नूर येथे यापूर्वी मानव व वन्यजीव संघर्ष खूप होता. येथे वन विभाग व एनजीओ यांच्या पुढाकारांनी प्रबोधात्मक कार्यक्रम वाढवले. येथील शेतकरी आता बिबट्याबरोबर राहण्यास सक्षम झाले आहेत. बिबट्याबद्दल शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिल्यास शेतकऱ्यांमध्ये निश्‍चित प्रबोधन होईल.

- भरत छेडा, मानद वन्य जीवरक्षक

leopards
सोलापूर : जिल्हात कोरोना टेस्ट घटल्या; दोघांचा मृत्यू

आजपर्यंतचा बिबट्याचा वावर

- 18 डिसेंबर 2020 वांगी नं. 4 येथे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घातल्या, चार हल्ले तीन ठार

- 26 जानेवारी 2021 वाळूज येथे बालक ठार

- मार्च 2021 पंढरपूर पेनूर पसिरात वावर

- 4 जून 2021 भोयरे (ता.मोहोळ) रेडकू ठार

- 4 ऑगस्ट 2021 चिंचोळी एमआयडीसीत सीसीटीव्हीत कैद, लांबोटीत वासराचा फडशा

- 6 ऑगस्ट 2021 शिरापूर (सो) परिसरातील धुमाकूळ

- 5 ऑक्‍टोबर 2021 हरी दोडमिसे हरळवाडी (ता.मोहोळ) येथे दर्शन

- 26 नोव्हेंबर 2021 टाकळी दिवे गव्हाण येथे आढळला बिबट्या

- 30 नोव्हेंबर 2021 सोगाव (पश्‍चिम) (ता. करमाळा) येथील गोडगे वस्तीवरील वासरू फस्त

- 8 डिसेंबर 2021 वडशिवणे, सातोली (ता. करमाळा) येथे बिबट्याचे दर्शन

- 6 डिसेंबर 2021 सोगाव (पश्‍चिम) (ता. करमाळा) आनंद पोळ यांच्या वासरावर हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com