लाईट का बंद केली? सूनेकडून सासू, सासऱ्यासह नवऱ्याला मारहाण

Crime
Crimeesakal
Summary

पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर: शहरात कौटुंबिक वादाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. एका घटनेत सासरा त्यांची मुलगी व नातीला घेऊन जावयाकडे गेले. त्यावेळी त्यांना घरी का आणले म्हणून जावयाने सासऱ्याच्या पोटावर चाकुने वार केले. तर दुसऱ्या घटनेत मोबाईलवर बोलताना लाईट का बंद केली म्हणून सूनेने सासू, सासरे व पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Crime
सोलापूर पोलिस आयुक्‍तालयाचा होणार विस्तार: गृहराज्यमंत्री

पत्नी व मुलीला घरी आणल्यावरुन जावयाने सासऱ्यावर केला चाकुने वार

सोलापूर : पत्नी व मुलीला घरी का आणले म्हणून जावयाने सासऱ्याच्या पोटावर चाकुने वार केले. कौटुंबिक वादातून जावई अजय चौगुले (रा. मंठाळकर वस्ती, तळे हिप्परगा) हा पत्नी व मुलीपासून वेगळा राहत होता. जावयाचा राग शांत झाला असेल, असे समजून सासरे सुभाष शाम बंदपट्टे (रा. कण्णी नगर, मारवाडी मंदिराजवळ, दहिटणे) यांनी स्वत:च्या मुलीसह नातीला सोबत घेऊन जावयाचे घर गाठले. त्यावेळी त्यांना घरी का आणले म्हणून शिवीगाळ करीत अजय चौगुले याने त्यांच्या पोटावर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी चौगुलेविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दुधाळ हे करीत आहेत.

सूनेने घेतला सासूच्या हातांचा चावा

सोलापूर : सून मोबाईलवर बोलत असताना त्यांचा तिचा पती अभिनय यांनी खोलीत जाऊन लाईट बंद केली. त्यामुळे चिडलेल्या वर्षा अभिनय जाधव (रा. विजयराज मार्वेल्स अपार्टमेंट, प्रेम नगर, जुळे सोलापूर) हिने भांडण सुरु केले. पती अभिनय हे समजावून सांगत असतानाच सासू छाया औदुंबर जाधव यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'तु सांगणारी कोण' असे म्हणून सासू छाया जाधव यांच्या दोन्ही हाताचा चावा घेतला. त्यानंतर पायावर टाचेने दाब देऊन गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच सासरच्या तोंडावर मोबाइल फेकून मारला. त्यानंतर तिचा पती अभिनय याच्या दोन्ही हातास चावा घेऊन त्याच्या डोक्‍यात कुकर घातला. सासू, सासरा, तिचा पती व दोन्ही मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सासू छाया जाधव यांनी सून वर्षा जाधव हिच्याविरुध्द विजापूर नाका पोलिसांत दिली. पोलिसांनी सूनेविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक दिपक वाल्मिकी हे पुढील तपास करीत आहेत.

Crime
सोलापूर: चालक पोलिस शिपाई पदासाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा

तक्रार मागे घेण्यावरुन मारहाण

सोलापूर : पोलिसांत मागे दिलेली तक्रार परत घे म्हणून काशीनाथ सिद्राम बुरबुरे (रा. शर्मा कापड दुकान, शुक्रवार पेठ) याच्यासह त्याच्या दोन मित्रांनी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्टीलच्या पट्टीने गळ्यावर मारून जखम केली, अशी फिर्याद शंकुतला विक्रम पवार (रा. बुधवार पेठ, मिलिंद नगर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यावरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक पोळ हे पुढील तपास करीत आहेत.

मागील भांडणातून लाकडाने मारहाण

सोलापूर : येथील गुजर वस्ती परिसरातील बहिणीच्या घरी जाताना दारु पिऊन थांबलेल्या सोमनाथ मळसिध्द शेंडगे (रा. गुजर वस्ती, दयानंद कॉलेजजवळ) याने हाक मारली. परंतु, न थांबता तसेच पुढे जात असताना त्याने मागील भांडणाच्या रागातून लाकडी दांडा असलेल्या कुऱ्हाडीच्या दांडक्‍याने मारहाण केली, अशी फिर्याद कुमार गोरख जटीथोर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. कपाळाच्या डाव्या बाजूस जखम झाली असून त्याने शिवीगाळही केली, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. सोमनाथ शेंडगेविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक मनोहर हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com