विमा कंपनीची फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा कायम

प्रधानमंत्री फसल बीमा योजना व हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या विमा कंपन्या प्रस्ताव स्वीकारत आहेत
विमा कंपनीची फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा कायम
sakal

मंगळवेढा : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा विमा कंपनीने कायम ठेवली.डाळींबत भोसे,आंधळगाव, पाटकळ,मारापुर,मंगळवेढा ही महसूल मंडळे वगळून निवडक मंडळांचा समावेश करून विमा कंपनीने आपल्यातील पक्षपाती कारभाराचा नमुना तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवला.

विमा कंपनीची फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा कायम
अकोट : नागराज मंजुळेंच्या लघुपटात कैलास खडसान यांना संधी

सन 2017 पासून ऑनलाईन केलेल्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना व हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या विमा कंपन्या प्रस्ताव स्वीकारत आहेत.सन 2021 च्या खरीप हंगामातील मृग बहारचा फळपिक विमा योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने स्वीकारला होता. तालुक्यांमध्ये हुलजंती, मरवडे, बोराळे,मंगळवेढा या 4 महसूल मंडळ मधील 4350 शेतकऱ्यांना 4 कोटी 61 लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आल्याची यादी नुकतीच सोशल मीडिया आली या यादीवर शेतकऱ्यातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत त्यामध्ये हुलजंती 3441,मरवडे 735,बोराळे 158, इतक्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा तर मरवडे 7,भोसे 1, लिंबू उत्पादक,हुलजंती 2,मरवडे 3,मारापूर 2 , सिताफळ,तर भोसे 1 पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश केला आहे यामध्ये एकाच महसूल मंडळ मध्ये इतर फळपिकांना विमा कंपनीने वंचित ठेवले आहे .

विमा कंपनीची फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा कायम
कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

गेल्या चार वर्षापासून दरवर्षी विमा कंपनी ठरवताना त्याच्या सोयीचे निकाल ठरवत असल्यामुळे विमा भरलेले शेतकरी मात्र प्रत्यक्षात राहून वंचित राहिले आहेत याबाबत विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल विचारायचे कोणी असा देखील प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे लुक्‍याच्या दक्षिण भागातील बहुतांश गावे दुष्काळी असतानादेखील या गावातील गावाला देखील या निकषात बसले नाही महसूल खात्याकडे प्रत्यक्ष नोंदलेला पाऊस आणि महावेध कडे नोंदविला पाऊस यामध्ये तफावत असल्यामुळे याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे शिवाय तालुकास्तरावरील अधिकारी व विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे देखील दिली जात नाहीत पीक नुकसानीची माहिती टोल फ्री क्रमांकावर दिली असता या कंपनीच्या कर्मचाऱ्याने कोरोनाच्या संकटात चक्क सोलापूरला जाऊन तक्रार करण्याचा अजब सल्ला दिला त्यामुळे फळपिक विमा हा शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्याच्या सोयीचा होत आहे.

पाटकळ येथे नव्याने 8 महसूल मंडळ कार्यान्वित झाले आहे याठिकाणी पर्जन्यमापक यंत्र देखील बसवले नाही त्यामुळे या मंडलमधील शेतकऱ्याना निकषाचा फटका बसला.शासन व विमा कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला.

दहा दिवसात विमा कंपनीने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा न दिल्यास या पुढील काळात या कंपनीला विमा प्रस्ताव घेवू दिला जाणार नाही.तालुक्यातून कंपनीचे कार्यालय हद्दपार करू.

- युवराज घुले जिल्हा संघटक स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com