मसले चौधरी येथील "बगाड" एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

यात्रेत सर्वच जाती-धर्माचे मानकरी
Kalbhairavnath Yatra all castes and religions bagad program solapur
Kalbhairavnath Yatra all castes and religions bagad program solapursakal

नरखेड - मसले चौधरी (ता.मोहोळ) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेतील बगाड कार्यक्रमात गावातील. विविध जाती-धर्मातील गावकऱ्यांना. मानकरी म्हणून बहुमान दिला जातो. त्यामुळे "बगाड" हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनले आहे. काळभैरवनाथाची यात्रा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यात्रेत विविध जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने व भक्ति भावाने सहभागी होतात. हा कार्यक्रम हजारो लोकांनी "याची देही याची डोळा अवघा देखिला बगाड सोहळा." या कार्यक्रमाचे आनंद घेतला.

मसले चौधरी येथे काळभैरवनाथ यात्रेस घटस्थापनेने सुरुवात होते. यात्रेनिमित्त श्री च्या काठीची सवाद्य मिरवणूक, आंबील काठीच्या मिरवणुकीनंतर श्रींच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले जाते. श्रींच्या मूर्तीस नैवेद्य दाखवला जातो. या कार्यक्रमात मोठ्या भक्तिभावाने साजरा करून. यानंतर बगाड फिवण्याचा कार्यक्रम सुरू केला जातो. या कार्यक्रमात गावातील सर्वच जाती-धर्माचे बांधव मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. या बगाडावर बसल्या नंतर खोबरे व गुलालाची मुक्तपणे उधळण केली जाते. हे उधळलेले खोबरे प्रत्येकजण काळभैरवनाथाचा प्रसाद म्हणून सेवन करतो. या वेळी काळभैरवनाथाचे नावाचा मोठ्या प्रमाणात यात्रेकरू जयजयकार करतात. तसेच या यात्रेमध्ये विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. कोरोना संसर्गाच्या मारीमुळे मागील दोन वर्षापासून यात्रा बंद होती. परंतु महाराष्ट्र शासनाने कोरोना संसर्गाचे सर्व निर्बंध उठवल्यामुळे. यात्रेसाठी पुणे मुंबई गोवा हैदराबाद तसेच पर राज्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येनेगर्दी केली होती, यंदा प्रथमच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले बगाड फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते. त्या फेसबुकला लाइव्हचे परदेशातील विविध ग्रामस्थांनी व चाकरमान्यांनी याची देही याची डोळा यात्रेचा आनंद घेतला.

अशी आहे बगाडाची उभारणी

काळभैरवनाथ यात्रेत मंदिराजवळील दगडी पारावर मध्यभागी सुमारे 3० फूट उंचीचा लाकडी खांब उभा केला जातो. या लाकडी खांबाला अंदाजे 30 ते 35 फूट लांबीचे मोठे ओंडक्याच्या स्वरूपाचे लाकूड ठेवले जाते. या लाकडाच्या दोन्ही बाजूला झोक्याच्या आकाराची मोठ्या रस्सी बाधली जाते. दोन्ही बाजुला सुमारे 30 ते 35 फुट लांबीची रस्सीच्या सहाय्याने गोल फिवले जाते. या बागाडावर सर्व जाती धर्माचे व पंचक्रोशीतील लोकमोठ्या भक्तिभावाने बसतात. बगाडावर बसून गुलाल खोबऱ्याची मुक्तपणे उधळण केली जाते. या बगाड फिरण्याच्या सर्व जाती-धर्माला मान दिला जातो.असल्यामुळेया भागाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com