Karnataka Election : विजय कर्नाटकात आणि जल्लोष मंगळवेढ्यात ! काँग्रेसचा 9 वर्षानंतर गुलाल

कर्नाटकातील विजय हा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी संजीवनी देणारा ठरला आहे भविष्यात काँग्रेस देशात व राज्यात चांगल्या पद्धतीने राहुल गांधी प्रियांका गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करेल असा विश्वास तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी व्यक्त केला.
solapur
solapursakal

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस पक्षाची बहुमताकडे वाटचाल होत असल्याने याचा आनंद व्यक्त करत मंगळवेढा काँग्रेसने तब्बल 9 वर्षानंतर विजयाचा जल्लोष गुलालाच्या उधळणीने साजरा केला.

येथील दामाजी चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी दामाजी पंताच्या पुतळ्यास तालुका अध्यक्ष प्रशांत साळे व अॅड नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, जिल्हा उपाध्यक्ष दादा पवार, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव,पांडुरंग जावळे, ग्रामीण विकास तज्ञ दत्तात्रय खडतरे, अनु.जाती जमातीचे उपाध्यक्ष नाथा ऐवळे,

solapur
Pune News : छुप्या संदेशाला डिकोड करणारी प्रणाली संरक्षण क्षेत्राला मिळणार - डॉ. सी.पी.रामनारायणन

तालुका सरचिटणीस आबा भोसले, समीर इनामदार, तसलीम अंकुजी,संदीप पवार मनोज माळी आदि यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मंगळवेढ्याच्या मतदारसंघात आमदार राष्ट्रवादीचा तर खासदार काँग्रेसचा अशी परिस्थिती होती मात्र मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत रिडालोसने जिंकला.स्व.आ.भारत भालके यांनी 2014 साली भारत भालके

solapur
Mumbai : मुंबईतील नालेसफाई कामाची भाजपाकडूनच पोलखोल; केवळ 30 टक्केच सफाई

यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून केल्यानंतर काँग्रेसने ही जागा जिंकली होती त्यावेळेला काँग्रेसने मंगळवेढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. त्यानंतर 2019 ला भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा राष्ट्रवादीकडे गेली भले राज्यात सरकार आले.

असले तरी काँग्रेसला स्वतंत्र जल्लोष करता आला नव्हता मात्र कर्नाटक झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतदानाच्या मतमोजणीनंतर काँग्रेस पक्षाने जवळपास 135 जागा जिंकल्याचा आनंदात मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा जल्लोष मंगळा साजरा करण्यात आला खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला होता.

त्याचा फायदा काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यापर्यंत झाला शिवाय प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेसने धार्मिक मुद्दे उपस्थित न करता विकासाचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करून मतदाराचे मन वळविण्यात यशस्वी ठरल्याने काँग्रेसला सत्तेपर्यंत जाता आल्याची प्रतिक्रिया अॅड नंदकुमार पवार यांनी दिली.

कर्नाटकातील विजय हा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी संजीवनी देणारा ठरला आहे भविष्यात काँग्रेस देशात व राज्यात चांगल्या पद्धतीने राहुल गांधी प्रियांका गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करेल असा विश्वास तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com