
सोलापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणुकीची आज मतमोजणी मुंबई येथे झाली. यामध्ये ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. व्यवस्थापन समितीत १० पैकी ८ जागा तर गव्हर्निंग काऊन्सीलच्या ९० पैकी ८५ जागांवर गांधी यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सोलापूर विभागातून केतन शहा व संजीव पाटील हे देखील जनरल काउन्सिलपदी बिनविरोध निवडून आले आहेत. वरिष्ठ उपाध्यक्षपदी रवींद्र माणगावे (सांगली) यांनी १६०५ मते मिळवून अनिल गचके (४८२ मते) यांना ११२३ मतांनी पराभूत केले. मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांनी १३५ मते मिळवून कविता देशमुख (५५मते) यांचा ८० मतांनी पराभव केला.
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत चेंबरच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच, गेल्या ४० वर्षातील सर्व ११ माजी अध्यक्ष यांचा पुढाकाराने एकता पॅनेलची स्थापना करून निवडणूक लढवत ललित गांधी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र ललित गांधी यांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे निर्विवाद वर्चस्व स्थापित करून एकहाती सत्ता काबीज केली आहे.
ट्रस्ट बोर्डचे चेअरमन, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्या बरोबर पॅनेलचे नेतृत्व केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे व सहायक निवडणूक अधिकारी व सह. सेक्रेटरी जनरल जे. के. पाटील यांनी काम पाहिले. निवडणूक समितीवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितीवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरुण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.