आसरा ब्रीजसाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच; संदीप कारंजे

नगर अभियंता कारंजे : रेल्वेकडून नवीन पुलाचा आराखडा होणार तयार
Land acquisition process for Asara Bridge solapur
Land acquisition process for Asara Bridge solapursakal

सोलापूर : आसरा येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ब्रीजसाठी लवकरच आसरा चौक ते महापालिका पाणीटाकीपर्यंत ब्रीजसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जागेची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. सन २०१७ पासून जुळे सोलापूर आणि आसरा परिसरातील नागरिकांची मागणी असलेल्या आसरा रेल्वे ब्रीजच्या रुंदीकरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळत आहे.

यामध्ये आसरा चौक ते डी मार्ट येथील महापालिका पाणीटाकीपर्यंत रस्त्याची मोजणी करण्याचे काम करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या ब्रीजच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस महापालिकेने रेल्वेस जागा उपलब्ध करून दिल्यास नवा ब्रीज उभारण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. आसरा रेल्वे ब्रीजच्या रुंदीकरणासाठी येथील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मागणी लावून धरली होती. सध्याचा असलेला जुना ब्रीज पाडून दुसरा ब्रीज बांधेपर्यत खूप कालावधी लागणार आहे. त्यामुळे असलेल्या ब्रीजच्या बाजूलाच नव्याने दुसरा ब्रीज उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ब्रीज रुंदीकरणासाठी लागणारी जागा महापलिका प्रशासनाकडून मोजणी करून देण्यात येईल. त्यानंतर रेल्वेकडून ब्रीजसाठी येणारा खर्च कळविण्यात येईल आणि महापालिकेने तो खर्च रेल्वेकडे भरल्यास रेल्वेकडून ते काम केले जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता एम. गौरी जगदीश, विश्‍वनाथ शेगावकर, नगरसेविका राजश्री चव्हाण, प्रमोद हुच्चे, गिरीश ख्याड, अनिल चव्हाण, अप्पू ख्याड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

ठळक बाबी...

  • साडेसात मीटरचा असणार रस्ता

  • रस्त्याच्या दोन्ही बाजूस दीड- दीड मीटरचा असणार फुटपाथ

  • ७०० मीटर रस्त्याची होणार मोजणी

  • नवीन ब्रीजमुळे अपघातांचे प्रमाण होणार कमी

  • ७० टक्के ट्राफिक जुळे सोलापूरला वळेल

  • २०१७ पासून पत्रव्यवहार सुरू

  • नवीन ब्रीज हा दोन लेनचा असणार

अतिक्रमणावर हातोडा

आसरा ते डी मार्ट महापालिका पाणीटाकीपर्यंत जमिनीची मोजणी केली जाणार आहे. या मार्गावरील ब्रीजच्या दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण काढले जाणार आहे. यासाठी अतिक्रमण विभाग आणि मोजणीसाठी महापालिकेचे पथक याठिकाणी लवकरच येणार असल्याचे नगर अभियंता कारंजे यांनी सांगितले.

आसरा चौक ते डी मार्टपर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामास लागणाऱ्या जमिनीची मोजणी करून भूसंपादन केले जाणार आहे. या कामास येत्या तीन-चार दिवसांत सुरवात होईल.

- संदीप कारंजे,नगर अभियंता, महापालिका

आसरा ते विजयपूर रोडला जोडणारा आसरा पुल हा अरुंद असल्याने दररोज अपघात होत आहेत. २०१७ पासून वेळोवेळी पाठपुरावा करून रुंदीकरण करण्याची मागणी केली. त्याचबरोबर रघोजी हॉस्पिटलकडे अंडरपास करण्याची मागणी केली आहे. जड वाहतुकीमुळे येथील नागरिक खूप वैतागले आहेत. रेल्वे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून या कामास लवकरच सुरवात करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

- मनीषा हुच्चे, नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com