मोबदल्यासाठी जीवंत शेतकरी मयत, प्रहार संघटनेचा आरोप

भूसंपादनाच्या मोबदल्यावरुन प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन 7 व्या दिवशीही सुरुच असून, जुनोनी ता. सांगोला येथील जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवण्यात प्रताप येथील प्रांत कार्यालयाने केल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
Agitation
Agitationsakal
Summary

भूसंपादनाच्या मोबदल्यावरुन प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन 7 व्या दिवशीही सुरुच असून, जुनोनी ता. सांगोला येथील जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवण्यात प्रताप येथील प्रांत कार्यालयाने केल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

मंगळवेढा - भूसंपादनाच्या मोबदल्यावरुन प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन 7 व्या दिवशीही सुरुच असून, जुनोनी ता. सांगोला येथील जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवण्यात प्रताप येथील प्रांत कार्यालयाने केल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान सत्ताबदलापुर्वी व सत्ता बदलानंतरही सत्तेत असलेल्या आ. बच्चू कडू च्या संघटनेच्या मागे आंदोलन करण्याचे शक्लकाष्ठ काही केल्या संपेना.

सांगोला व मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्व. आ. भारत भालके यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेले प्रांत कार्यालय महामार्गासाठी संपादीत जमीनीच्या मोबादला वाटपातील अनियमीतेमुळे बदनाम होवू लागले आहे. प्रहार संघटनेच्या वतीने यापुर्वीही आंदोलन केले होते. पण यातील काही प्रश्‍न मार्गी लागले नसल्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यात उपसले आहे. तालुक्यातील सहा गावातील काझी प्रकरणाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. अल्पसंख्याक मंत्री यांनी स्थगिती दिल्याच्या कारणास्तव थांबविले सत्ता बदल झाला तरी स्थगीतीचे कारण सांगीतले जाते.

वास्तविक पाहता या प्रकरणात जिल्हाधिकाय्रांनी अहवाल तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री यांना दिला. पण, काझी बाधित मधील ज्या शेतकऱ्यांनी मोठी टक्केवारी दिली, त्या शेतकऱ्यांना मोबदला मात्र दिल्याचा आरोप करण्यात आला. जुनोनी ता. सांगोला येथील गट नंबर 642 मधील बाधीत शेतकरी लक्ष्मीबाई बोधगिरे जिवंत आहेत. त्यांना मयत दाखवून त्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला दुसऱ्यांना वाटप केला. आंधळगाव येथे बाधीत नसताना त्यांना मात्र कोट्यावधी रुपये वाटप केले. बाधीतांना मात्र या मोबदल्यापासून लांब ठेवले. सहा दिवसातील आंदोलनादरम्यान प्रांत कार्यालयातील जबाबदार अधिकाय्रांनी याकडे दुर्लक्ष केले. तर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी थांबविण्याबाबत विनंती केली. मात्र, आंदोलकांनी बाधीत शेतकय्राचे प्रश्‍न मार्गी लावला आम्हाला लेखी पत्राची आवश्यकता नाही. दरम्यान, स्वाभीमानी शेतकरी संघटना व बळीराजा शेतकरी संघटनेने पाठीबा दिला. एकंदरीत प्रहार आंदोलकांनी भूसंपादनातील गैरप्रकाराबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे महसूल खात्याकडून अदयापही स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही.

या कार्यालयात मूळ पदभार नसलेल्या तात्पुरत्या स्वरुपात वर्ग केलेल्या कर्मचार्यांनी मोबादला न मिळालेल्यांनी आंदोलन सुरू होताच त्यातील काही बाधीतांना सुनावणीची नोटीस बजावली आहे. ही जबरदस्ती प्रहार सहन करून घेणार नाही शेतकर्यांना न्याय मिळाल्याशिवाय प्रहार शांत बसणार नाही.

- समाधान हेंबाडे, तालुकाध्यक्ष प्रहार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com