भारनियमनामुळे शेतातील पिके करपत असताना आयपीएलचा झगमगाट का?

विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
Dr Babasaheb Deshmukh
Dr Babasaheb DeshmukhSakal
Summary

विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

सांगोला - शहरी भागात दिवस-रात्र विजेचा (Electricity) झगमगाट, मात्र ग्रामीण भागात (Rural Area) मोठ्या प्रमाणावर भारनियमन. (Laod Shedding) त्यातच एकीकडे विजेमुळे शेतातील पिके (Agriculture Crop) जळून जात आहेत, तर दुसरीकडे आयपीएलच्या मॅचेस (IPL Cricket Matches) भरण्यासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे. ग्रामीण भागातील राहणाऱ्यांवर अन्याय का ? असा सवाल करीत विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून याबाबत आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू व पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

वीज भारनियमन याबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात वीज टंचाईमुळे भारनियमन करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु हे भारनियमन सगळीकडेच सारखे होत नाही. याचा सर्वात जास्त मोठा फटका ग्रामीण भागात बसतो आहे. ग्रामीण भागात वेळी-अवेळी, केव्हाही हे भारनियमन केले जात आहे. परंतु एकीकडे महाराष्ट्रात वीज टंचाई असताना महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. तेथे वीज वापर होत नाही का ? आयपीएल मॅचेस भरवण्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु भारनियमन समस्येबाबत ग्रामीण भागातील अन्नदात्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात आहे. तो आम्ही यापुढे सहन करणार नाही. विजेच्या टंचाईचा सामना सर्वजण मिळून करूया.

परंतु ग्रामीण भागावर आम्ही अन्याय सहन करणार नाही. हे असेच सुरू राहिले तर पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून राज्यभर याविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

अन्नदात्यावरच अन्याय का ?

आपल्याकडे शेती हा प्रमुख उद्योग असला तरी इतर उद्योगाप्रमाणे शेती उद्योगाला मदत केली जात नाही. आजच्या भारनियमनाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्याला बसत आहे. सांगोला तालुक्यात डाळिंबाची झाडे जळत असताना शेतकरी नगदी पिकाकडे वळला आहे. परंतु सध्याच्या भारनियमनामुळे टरबूज, कलिंगड, टोमॅटो, मिरची व इतर पालेभाज्या पिकांना सध्याच्या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com