esakal | सोलापूरच्या संगीत क्षेत्रात मानाचा तुरा ! सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांना मध्य प्रदेशचा उस्ताद लतीफखॉं पुरस्कार जाहीर 
sakal

बोलून बातमी शोधा

pandit bhimanna jadhav.jpg

येथील सुंद्रीवादक कलावंत भीमण्णा जाधव हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुंद्री वाद्याचे वादन करतात. ते सुंद्रीवाद्याच्या प्रसाराचे कार्य करीत आहेत. त्यांनी सुंद्री वादनाचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे आजोबा गुरुवर्य सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव व त्यांचे वडील पंडित चिदानंद जाधव यांच्याकडून घेतले. त्यांचे आजोबा व वडील हे सुंद्री वाद्याचे महान वादक म्हणून परिचित होते. 

सोलापूरच्या संगीत क्षेत्रात मानाचा तुरा ! सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांना मध्य प्रदेशचा उस्ताद लतीफखॉं पुरस्कार जाहीर 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः दुर्लभ वादन कलेमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल येथील सुप्रसिद्ध सुंद्रीवादक कलावंत पंडित भीमण्णा जाधव यांना मध्य प्रदेश शासनाच्या मध्य प्रदेश सांस्कृतिक 
परिषदेतर्फे दिला जाणारा उस्ताद लतीफखॉं पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे पंडित भीमण्णा जाधव हे महाराष्ट्रातील पहिले कलावंत आहेत. 

हेही वाचाः माझी रायगड वारी 

येथील सुंद्रीवादक कलावंत भीमण्णा जाधव हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुंद्री वाद्याचे वादन करतात. ते सुंद्रीवाद्याच्या प्रसाराचे कार्य करीत आहेत. त्यांनी सुंद्री वादनाचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे आजोबा गुरुवर्य सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव व त्यांचे वडील पंडित चिदानंद जाधव यांच्याकडून घेतले. त्यांचे आजोबा व वडील हे सुंद्री वाद्याचे महान वादक म्हणून परिचित होते. 

हेही वाचाः आमदार यशवंत मानेः भागाईवाडीचे विकासाचे मॉडेल 

सुंद्री हे अत्यंत दुर्मिळ वाद्य असून, त्याला वाद्यसंगीत जगात प्रतिष्ठित करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांना फेलोशिप दिली. तसेच भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी फ्रान्स, बेल्जियम येथे झालेल्या संगीत महोत्सवात सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या केंद्रीय संगीत नाटक अकादमी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत सुंद्रीवाद्य वादन गुरू-शिष्य परंपरा योजनेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना या कलेचे शिक्षण देत आहेत. सुंद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ व दुर्गम सुंद्रीवाद्य कला अकादमीच्या माध्यमातून कार्यशाळा, महोत्सव, सेमिनार, परिसंवाद, संगीत समारोहांचे त्यांनी आयोजन केले. देशाच्या विविध राज्यांतील तरुण कलावंतांना त्यांच्या कलेसाठी सुंद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव युवा पुरस्काराने सन्मानित केले जाते. 

श्री. जाधव हे आकाशवाणीचे "ए' ग्रेडचे कलावंत आहेत. आकाशवाणी राष्ट्रीय संगीत संमेलनासह देशातील अनेक संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. या माध्यमातून त्यांनी सुंद्री वाद्याचे जतन व कलेचे संवर्धन केले. त्यांच्या वादनाच्या अनेक ध्वनिफिती व सीडी निर्मित झाल्या आहेत. त्यांना आतापर्यंत अखिल भारत आकाशवाणी पुरस्कार, युवा पुरस्कार, पंडित कलाभूषण पुरस्कार, सूरमणी पुरस्कार, जदोभट्ट पुरस्कार, भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार, गिरनार रत्न पुरस्कार, शिवरंजनी पुरस्कार असे एकूण 33 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

उस्ताद लतीफखॉं पुरस्कार मिळवणारे पंडित भीमण्णा जाधव हे महाराष्ट्राचे पहिले कलावंत आहेत. देशपातळीवर दरवर्षी एकाच कलावंताची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्काराचे स्वरूप एक्‍कावन्न हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह देशातील नामवंत संगीत कलावंतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  

loading image
go to top