esakal | स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिलांचेही कामाला अनन्य साधारण महत्त्व
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Londhe said that the work of women working in the sanitation department is of unique importance in the society

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिलांचेही कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिलांचेही कामाला अनन्य साधारण महत्त्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिलांचेही कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. तरी त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचा सत्कार केला, असे मत संस्थेचे अध्यक्ष संयोजक महेश लोंढे यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळी पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशजी वाले व ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आले. अध्यक्षस्थानी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद भोसले व सरचिटणीस सुमित भोसले, परिवहन समितीचे तिरूपती परकीपंडला, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भैरू लोंढे उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्रकाश वाले यांनी एम.एल. युवक प्रतिष्ठानचे कार्यक्रम हे समाजातील तळागाळातील लोकांच्या मदतीचे असतात अशीच प्रेरणा घेवुन युवकांनी कार्य करावे असे मत व्यक्त केले.

महापालिकेचे कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या लाभापासून वंचित

सदर कार्यक्रमास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मनोज लोंढे, सामाजिक कार्यकर्ते साक्षांत लोखंडे, अध्यक्ष निखिल पवार, सचिन भोसले, शाहू सलगर, अभिजीत डोलारे, खुशाल देवकुळे, आकाश कदम, शंकर भोसले, सिध्दार्थ पवार, किरण गायकवाड आदि पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरुपती परकीपंडला आणि आभार मनोज लोंढे यांनी मानले.