शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी काळे यांचे चक्क खड्ड्यात बसून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी काळे यांचे चक्क खड्ड्यात बसून आंदोलन

मोहोळ : उड्डाणपूल ते आठवडा बाजार या मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत या मागणीसाठी क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानच्या वतीने या संघटनेचे अध्यक्ष दशरथ काळे यांनी 15 ऑगस्ट दिनी चक्क नगरपरिषदे समोरील खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ योगेश डोके यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचे लेखी पत्र दशरथ काळे यांना दिल्याने तुर्त आंदोलन स्थगित केल्याचे काळे यांनी सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ शहरातील उड्डाणपूल ते आठवडा बाजार हा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा शहरातील रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर कायम रहदारी असते तसेच ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय व अन्य विभागाच्या कामासाठी नागरिकांना तसेच अधिकाऱ्याना हाच रस्ता आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून अंगावर पाणी उडाल्याने सारखा संघर्ष सुरू असतो. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप दशरथ काळे यांनी निवेदनाव्दारे केला आहे.

याचा सर्वात जास्त फटका दुचाकी स्वाराला बसतो. याच रस्त्यावरून शाळकरी मुले, दूध ,भाजीपाला फळे यांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यात मोटरसायकल आढळल्याने अनेक छोटे मोठे आपघात देखील रस्त्यावर नित्याचेच झाले आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादी टाकावे तसेच या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी काळे यांनी केली होती. यावेळी पृथ्वीराज काळे, बाळासाहेब क्षीरसागर, बापूसाहेब आठवले, संगम बळवंतराव, आकाश राऊत, रोहिदास पवार, महेश वाघमोडे, करण साळुंखे, श्रीशैल निस्ताने, अविनाश क्षीरसागर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश शिवपूजे, शहराध्यक्ष किशोर पवार, भीम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कांबळे, बाळासाहेब वाघमोडे, यांनी पाठिंबा दिला.

या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास मोहोळ नगरपरिषद ई निविदा काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाच दिवसात पाठवणार असून, सदर कामाची सुरक्षा ठेव नगरपरिषद फंडात जमा करणार असून, या रस्त्याचे काम नगर परिषदे मार्फत पावसाचा अंदाज घेऊन करण्यात येणार आहे.

डॉ .योगेश डोके ,मुख्याधिकारीमोहोळ नगरपरिषद मोहोळ.

Web Title: Main Road Of The City Protest By Sitting Potholes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..