कर्नाटकातील व्यक्तीचा खून ! अक्कलकोट येथील विहिरीत आढळला दोन तुकड्यांमध्ये मृतदेह

Crime Scene
Crime Scene

अक्कलकोट (सोलापूर) : येथील एका शेताच्या बाजूला असलेल्या घाण पाण्याच्या विहिरीत दोन पोत्यांमध्ये दोन तुकड्यांत असलेल्या स्थितीतील मृतदेह कर्नाटक पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला. हिरोळी (ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक) येथील 40 वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह घाण पाण्याच्या विहिरीत टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आळंद पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्‍टर एस. मंजुनाथ यांनी ही महिती दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की मृत व्यक्तीचे नाव नागप्पा अंदप्पा वाडेद (वय 40, रा. हिरोळी, ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक) असे आहे. संशयित आरोपीचे नाव मल्लिनाथ वाडेद (वय 38) व इतर पाच संशयित आहेत. संशयितांपैकी तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, दोघे संशयित फरार आहेत. 

संशयित आरोपी मल्लिनाथ वाडेद हा अक्कलकोट येथील एकाच्या शेतामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रोजंदारीवर काम करीत होता. मृत नागप्पा याच्या पहिल्या बायकोचा मृत्यू झाला होता. मृत नागप्पास तुझे लग्न लावून देतो म्हणून संशयित आरोपींनी बोलावून घेतले. त्याचा कुऱ्हाडीने मारून दोन तुकडे करून पोत्यात घालून घाण पाण्याच्या विहिरीत टाकले. मृत नागप्पा हरवल्याची केस कर्नाटक राज्यातील मादनहिप्परगा पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी नोंद झाली होती. याचा तपास करताना संशयित आरोपी मिळाले व अक्कलकोट येथे घाण पाण्याच्या विहिरीत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह काढण्यासाठी माजी नगरसेवक सुनील सिद्धे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना मदत केली. 

तपासासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांच्या पथकामध्ये मादन हिप्परगा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इंदुमती जाधव, आळंद पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्‍टर एस. मंजुनाथ, आळंदचे पोलिस उपनिरीक्षक महांतेश पाटील व इतर आठ-दहा कर्नाटक पोलिसांचा समावेश होता. खुनाचे कारण उघड झालेले नसले तरी शेतीच्या कारणावरून खून झाल्याचा संशय कर्नाटक पोलिसांच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याची नोंद मादन हिप्परगा पोलिस स्टेशनमध्ये झाली असून, याची माहिती सर्कल इन्स्पेक्‍टर एस. मंजुनाथ यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com