
Rural Hospital : मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयाचा 100 खाटाचा प्रस्ताव प्रलंबित
मंगळवेढा : तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयातील तोकड्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे याशिवाय नवीन वाढीव 100 खाटाचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित असून या प्रस्तावाला मंजुरी मिळावी अशी मागणी तालुक्यातील तालुक्यातून होत आहे. शहर व तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता सध्या शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे अस्तित्वात आहेत शासनाने नव्या रचनेनुसार तालुक्यामध्ये 9 उपकेंद्रे, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय प्रास्तावित केले होते अशा परिस्थितीत दोन वर्षांपूर्वी तालुक्याला कोरोनाचा झटका बसला त्यामध्ये ऑक्सिजन बेडसह साधारण बेड साठी रुग्णाला मोठा प्रतीक्षा करावी लागली.
बेडसाठी परराज्या आधार घ्यावा लागला. यामध्ये काहींना आपला जीव गमावा लागला अशा परिस्थितीत पंढरपूर विधानसभेची पोट निवडणूक झाली होती.पोटनिवडणुकीतून आमदार झाल्यानंतर आ.समाधान आवताडे यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या अस्तित्वात असलेल्या खटांच्या संख्येत वाढ करून ती संख्या 100 करण्याची मागणी केली व निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानंतर झालेल्या अधिवेशनात देखील आ. अवताडे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान आरोग्य खात्याकडून देखील याबाबतचा प्रस्ताव सध्या मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे परंतु त्याला अद्याप मान्यता मिळाली नसल्यामुळे तालुक्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे यांचा कारखानदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याशी संबंध येत असल्यामुळे त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून या धुळकात पडलेल्या मागणीकडे तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी होत आहे दरम्यान 2 महिन्यापूर्वी मंगळवेढ्यातील सजग नागरिक संघाच्या वतीने दिल्ली येथे आरोग्य व शिक्षणाच्या पाहणीसाठी अभ्यास दौरा केल्यानंतर त्यांनी देखील दोन दिवसांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली या बैठकीमध्ये चतुर श्रेणी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय अतिरिक्त शेडची आवश्यकता आहे व प्रलंबित असलेल्या बेडचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेले डॉ. शरद शिर्के यांनी शेड साठी दोन लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली व मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या बेडच्या प्रश्ना संदर्भात या संघाने आ. समाधान आवताडे यांची भेट घेऊन या प्रश्न लक्ष घालण्याची मागणी केली व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे भरण्याची देखील विनंती करण्यात आली. पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आ समाधान आवताडे यांनी या शिष्टमंडळाला दिले.
20 बेडचे कोवीड हॉस्पीटल व लेबर रूमचे काम अंतीम टप्यात असून या नंतर रूग्णांना आणखी चांगली सुविधा देता येईल.सध्या उपलब्ध साधनावर रुग्णावर उपचार व औषधे देवून चांगल्या पध्दतीने सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.7 के ल चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक कार्यान्वित आहे
- दिपक धोत्रे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय