Mangalwedha Crime : 5 चोरीच्या गुन्ह्यातील तपासाला यश, एक लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास मंगळवेढा पोलिसांना यश आले. यामध्ये सहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime
CrimeSakal

मंगळवेढा - वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास मंगळवेढा पोलिसांना यश आले. यामध्ये सहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रंजीत माने म्हणाले की, पहिल्या घटनेतील फिर्यादी बैजनाथ जनार्दन शिंदे भारत फायनान्सच्या लोन ऑफिसरने भोसे परिसरातून वसुलीची रक्कम घेवुन मंगळवेढ्यास येत असताना शहरानजीक पाठीमागुन युनिकॉर्न गाडीवरुन तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवुन 45 हजार 336 रुपये रोख व एक टॅब, बायोमेर्टीक मशीनसह बॅग हिसकावुन पळुन गेले. या प्रकरणात तीन संशयीतानी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन 25 हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली 75 हजार किंमतीची युनिकॉर्न दुचाकी जप्त करण्यात आली.

दुसऱ्या घटनेतील फिर्यादी महादेव चिंतु लेंडवे, रा. लेंडवे चिंचाळे हा जेवण करून झोपला असता दोन इसमांनी हातात कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांच्या खिशातील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीच्या पत्नीच्या गळयातील २० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्रातील मनी जबरीने चोरी केली. या प्रकरणात एका संशयीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडुन 3 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी जप्त करण्यात आले.

पंढरपुर पोलीसकडील तिसऱ्या घटनेतील भाळवणी ते पंढरपुर रोड वर सातारा नाल्याजवळ मोटारसाकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीच्या मोटारसायकला लाथ मारून फिर्यादीकडील बॅग हिसकावुन रक्कम रुपये 1 लाख 68 हजार 240 रू रोख रक्कम, एक टॅब चोरुन नेला.

पहिल्या घटनेतील आरोपीकडे अधिक तपास केला असता, पंढरपुर ग्रामीण हददीमधील जबरी चोरी केल्याची कबुली दिली. तर चौथ्या घटनेत फिर्यादी मयुर महादेव पाटील, रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा याची पंढरपुर रोडवरील सम्राट मोटार या दुकानासमोर लावलेली ज्युपिटर मोटारसाकल एमएच 13 सीई 5388 च्या डिक्कीमध्ये ठेवलेली 1 लाखाच्या चोरी प्रकरणी संशयीत तिन आरोपी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात चोरी रकमेपैकी 35 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आले. तर 5 व्या घटनेतील नागनेवाडी येथील तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जीम जीममधील 2 लाखाच्या साहित्य चोरी प्रकरणात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कडुन 40 हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला.

या गुन्हयामध्ये 6 आरोपी अटक करुन त्यांचे कडून चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींची ओळख परेड करावयाची असल्यामुळे त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि. बापु पिंगळे, पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे, पो.हे.कॉ. हजरत पठाण, पो.ना. सुनिल मोरे, पो.कों. अजित मिसाळ, पो.कों. अजय शिंदे, पो.कों. वैभव घायाळ सायबर पोलीस स्टेशनचे पो.ना. युसुफ पठाण यांनी गुन्हयाचा कौश्यल्यपुर्ण तपास करुन ऐवज हस्तगत करण्यात व तपासकामी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com