मंगळवेढा पोलिस ठाण्‍यातील हवालदार निलंबित

वाहनावर हवालदार अर्जुन मुळे यांनी कायदेशीर कारवाई न करता ती वाहने आर्थिक तडजोडीतून सोडून दिली.
police
policesakal

मंगळवेढा : लक्ष्मीदहिवडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपर व टमटम या वाहनावर कारवाई न करता आर्थिक तडजोडीतून सोडून दिल्याप्रकरणी पोलिस हवालदार अर्जुन मूळे यांच्यावर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.

सांगोला येथील माण नदीपात्रातून बेकायदा वाळू घेऊन आलेले टिपर व टमटम ही दोन वाहने (ता. ७) रोजी रात्री २.४० च्या दरम्यान लक्ष्मी दहिवडी ते सावे गावाकडे जाणाऱ्या गौरी जलधाराच्या समोर पोलिसांनी पकडलेली होती. वाहनावर हवालदार अर्जुन मुळे यांनी कायदेशीर कारवाई न करता ती वाहने आर्थिक तडजोडीतून सोडून दिली. याची तक्रार पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त झाली.

त्यांनी सखोल चौकशी करून हवलदार अर्जुन मुळे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाचा आदेश काढला. याबाबतचा आदेश मंगळवेढा पोलिस ठाण्यात धडकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com