मंगळवेढा : विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेसमोर भाजपाचे श्राद्ध आंदोलन

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ येथुन निषेध मोर्चा काढून पालिकेसमोर श्राध्द आंदोलन करण्यात आले.
Shraddha Andolan by BJP
Shraddha Andolan by BJPSakal
Summary

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ येथुन निषेध मोर्चा काढून पालिकेसमोर श्राध्द आंदोलन करण्यात आले.

मंगळवेढा - शहरातील विविध समस्याबाबत प्रशासक असलेल्या नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल न घेतल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारभारा विरुध्द भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने श्राध्द आंदोलन करण्यात आले.

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ येथुन निषेध मोर्चा काढून पालिकेसमोर श्राध्द आंदोलन करण्यात आले. यामध्ये या प्रभागातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांवरिल खड्डे दुरुस्ती करुन खड्डेमुक्त मंगळवेढा करावे. कृष्ण तलाव झोपडपट्टी येथे रस्त्यांवरील दिवे, रस्ता मुरुमीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, गटारे, शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. अंबाबाई मंदिर परिसर झोपडपट्टी येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्यांची सोय, शौचालयांची दुरुस्ती व गटारे बांधून दयावे. व शौचालयाचे सांड पाणी उघडयावर सोडण्यात आले आहे. ही त्वरित उपाय योजना करण्यात यावी.

जयभवानी सोसायटी, सनगर गल्ली, मेटकरी गल्ली, बेरड गल्ली, माळी गल्ली येथिल शौचालयाची साफ सफाई व दुरुस्तीसह बेरड गल्ली येथील मुख्य गटार करण्यात यावे. बुरुड गल्ली, गायकवाड गल्ली येथे पेवर ब्लॉक बसवून रस्ता करण्यात यावा.मलेरिया जनजागृती व धुर फवारणी करण्यात यावी. मागण्याचे निवेदन मंगळवेढा मुख्यधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्याकडे देण्यात आले. चंद्रकांत पवार, सुदर्शन यादव, नारायण गोवे, राजकुमार स्वामी, दिपक पवार, रेखा पवार, रूक्मिणी निंबगरे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वच्छता व जाहिरातीवर लाखो रुपये खर्चूनही त्या प्रमाणात शहर स्वच्छ दिसत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत सर्व कामे ही दिखावू व बोगस पणाणे करत आहे. ज्यावेळी स्वच्छ सर्वेक्षणासाठी बाहेरून आलेल्या पथकाला बोगस कचरा पेटी दाखवून सर्व चौकाचौकात चित्रपटा सारखे कचारापेट्यांचे सेटअप लावून त्याचे फोटो काढून स्वच्छ शहर आहे असे दाखवून बोगस काम करत होते, हा सर्व डाव भाजपाच्या पदाधिका-यांनी उधळून लावला. आता त्याच कचरापेट्या जुनी मंडई येथे दयनिय अवस्थेत पडली. येत्या सात दिवसात पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- आदित्य हिंदुस्तानी, जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी युवा मोर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com