घरफोडीच्या गुन्हयात सराईत आंतरराज्य गुन्हेगाराकडून मुद्देमाल जप्त

सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल
Thief
Thief sakal

मंगळवेढा : घरफोडीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या सराईत आंतरराज्य गुन्हेगाराकडून मारोळी,सलगर बु, लक्ष्मी दहिवडी सह येथील चोरीतील ब्रिटीशकालीन चांदीच्या नाणी, सोन्या चांदीचे दागिन्यासह 2 लाख 2 हजार 180 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.27 ते 28 मार्च 22 चे दरम्यान मारोळी येथे अज्ञात चोरटयांनी संपता पांढरे, वय 42 व त्यांचे शेजारचे मारूती शिंदे या दोघांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून 91,800 रू. किं. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि सुहास जगताप यांनी गुन्हे शाखेकडील सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास सांगोला व मंगळवेढा या पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या.सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक मोहोळ भागात असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मारोळी येथील घरफोडी चोरीचा गुन्हा हा रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगाराने व त्याचे साथीदार मिळून केला असून तो सध्या पंढरपूर येथील तीन रस्ता जवळील मोकळया मैदानामध्ये राहवयास असून तेथील झोपडीमध्ये असल्याची बातमी मिळाल्यावरून रविंद्र मांजरे व त्यांचे पथक तेथे जावून येलप्पा उर्फ खल्या अद्रक शिंदे वय - 40 वर्षे, सध्या रा. दत्तनगर मोहोळ, जि. सोलापुर मूळ रा. कर्नाटक त्याने त्याचे इतर साथीदार सोबत घेवून मारोळी येथील घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले.

अधिक तपासात त्यानी लक्ष्मीदहिवडी, सलगर ब्रु ता. मंगळवेढा व तेलगांव ता. उत्तर सोलापूर असे एकूण 05 ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल दिली.त्याचेकडून वरील सर्व गुन्हयांत मालापैकी एकूण 24 ग्रॅम सोन्याचे दागिने व 123 चांदीचे नाणी 1420 ग्रॅम नाणी असा एकूण 2,02,180 रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी विरूध्द कामती ,अलमेल व अफजलपूर (कर्नाटक)येथे गुन्हे दाखल आहेत

सदरची उल्लेखणीय कामगिरी गुन्हे शाखेचे पो.नि सुहास जगताप, मंगळवेढ्याचे पो. नि. रणजित माने यांचे नेतृत्वाखाली स.पो. नि. रविंद्र मांजरे, सफौ/ खाजा मुजावर, पोहेकाॅ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख,दत्ता येलपल्ले यांनी बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com