राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील
Summary

नवे चिटणीस मंडळ एका महिन्यात स्थापन करुन यामध्ये तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सांगोला (सोलापूर): राज्यात महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असला तरी सांगोल्यात महाविकास आघाडी होण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे महाविकास आघाडी होणार नाही. राज्यातील शेकाप पक्षाचे चिटणीस मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवे चिटणीस मंडळ एका महिन्यात स्थापन करुन यामध्ये तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील
कृषिमंत्री भुसे शनिवारी सांगोला दौऱ्यावर! डाळिंब उत्पादकांना कुतूहल

सांगोल्यात शेकाप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दोन दिवस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेकापचे आमदार जयंत पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे राज्यातील जिल्हा, शेकापच्या दोन दिवसीय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सहा ठराव करण्यात आले. यात राज्यातील वीज ग्राहकांना सवलत द्यावी. विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची फी शासनाने भरावी, आरक्षण बाबतीत केंद्र व राज्य सरकारने फसवणूक केली असून 50 टक्के आरक्षण जाहीर करावे. महिलांवरील अत्याचाराची गंभीर परिस्थिती असून केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे संबंधित गुन्हेगारांना अटक करून सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत देण्याची फक्त घोषणा केली, तातडीने पूरग्रस्तांना मदत द्यावी असे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील
दूध संघात माढा, करमाळा, सांगोला किंगमेकर! तयारी निवडणुकीची

राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे. राज्यातील सर्व चिटणीस मंडळ बरखास्त केले असून पक्ष निरीक्षक राज्याचा दौरा करणार असून त्यानंतर शेकापच्या नव्या चिटणीस मंडळाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी महाविकास आघाडीचा प्रयोग सांगोल्यात होणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पक्षात नाराजी असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुका चिटणीस मंडळात 25 ते 30 सदस्यांची टीम केली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी सांगोल्यात तशी परिस्थिती नसून महाविकास आघाडीचा प्रयोग सांगोल्यात होणार नसल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील
सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध! सांगोला नगरपरिषदेमार्फत आंदोलन

भाजपबरोबर युती नाही

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांनी इच्छा या बैठकीत व्यक्त केली आहे. मात्र, समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. सांगोल्यात निवडणूकीसाठी भाजपबरोबर युती होणार नसून समविचारी आघाडीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com