"प्राण जाए पर पानी ना जाए !' उजनीच्या पाण्यासाठी प्रणिती शिंदेंचा हट्ट

उजनी धरणातून सोलापूरचे हक्काचे पाणी मिळायला पाहिजे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली
Praniti Shinde
Praniti ShindeEsakal

सोलापूर : उजनी धरणातील (Ujani Dam) पाणी प्रश्न सध्या चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस प्रांतीय कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी सोलापूरच्या हक्काच्या उजनीच्या पाण्यासाठी "प्राण जाए पर पानी न जाए' असा हट्ट धरला आहे. येत्या जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात सोलापूरवासीयांना एका दिवसाआड पाणी मिळायला हवं, अशी आग्रही भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे. (MLA Praniti Shinde demanded that Solapur should get its rightful water from Ujani dam)

येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली ठोस भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, महापालिकेमध्ये पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हायला हवे. दरम्यान, उजनीच्या पाण्याची गळती गेल्या तीन -चार वर्षांपासून होत असल्याचं समोर आलं आहे, मात्र त्याची दुरुस्ती का नाही झाली? येत्या एक महिन्यात उजनीच्या गळतीची दुरुस्ती ताबडतोब करून सोलापूरकरांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे.

Praniti Shinde
इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

पाणीपुरवठ्याचे तीन सोर्स असूनसुद्धा एक दिवसाआड पाणी का मिळत नाही, हा प्रश्‍न आहे. आणि कुठला अधिकारी पाण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, त्यांच्यावर योग्य ती त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आम्हाला आमच्या हिश्‍श्‍याचे पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. आता एवढं पाणी उपलब्ध आहे की दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो; पण पाणी दिलं जात नाही, असा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या हक्काचं पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रणिती शिंदे यांनी आज घेतलेली भूमिका महत्त्वाची असणार आहे.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com