
Solapur : स्टीफन बैठकीतून आमदार समाधान अवताडे यांनी घेतला पक्ष बांधणीचा आढावा
मंगळवेढा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात बूथ प्रमुख, शक्ती केंद्र आणि मतदारसंघातील जनतेशी संपर्कात राहून 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनेची माहिती लोकांना होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांबरोबर स्टिफीन बैठकीत घरातून मंदिरात डब्यावर ताव मारला.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, शिवाजी पटाप, अंबादास कुलकर्णी, दिगंबर यादव, नागेश डोंगरे ,सुदर्शन यादव,सुशांत हजारे, शांताप्पा बिराजदार, संतोष चव्हाण या भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवणगी येथील महालिंगराया मंदिरामध्ये स्टिफीन बैठकीत कार्यकर्ते समवेत घरातून आणलेल्या डब्याचा आस्वाद घेताना मतदारसंघात बुथ प्रमुख,शक्ती केंद्र याचा आढावा घेतला. 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबवलेल्या प्रधानमंत्री उजाला योजना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना मुद्रा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या योजनेचा लाभ ग्रामीण भागात पर्यंत लोकांपर्यंत पोहोचला का याची माहिती जाणून घेऊन या योजनेचा आणखीन लोकांना लाभ होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना आ. समाधान आवताडे म्हणाले की , भारतीय जनता पार्टी हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे .
सामान्य कार्यकर्त्यांपासून ही पार्टी बनलेली आहे. यामध्ये एकोपा राहावा , आपापसातली सुखदुःख समजावेत तसेच आपल्या ज्या काही समस्या असतील त्या लोकप्रतिनिधींना समजाव्या व लोकप्रतिनिधी हा कोणी दुसरा नसून आपल्यातलाच एक जण आहे ही आपुलकी निर्माण होण्याकरता या टिफिन बैठकीचे आयोजन आहे.
ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत झालेला बदल प्रत्येक क्षेत्रामधला बदल सर्व जनतेपर्यंत पोहचवून येत्या काळामध्ये आपल्याला नव्या उमेदीने काम करावे लागेल मतदार संघा मधला प्रत्येक बूथ सशक्त करून आपल्याला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदीना साथ द्यायची आहे,
भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी आगामी काळामध्ये या अभियानामध्ये कशा पद्धतीने काम करावे कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवून सरकारची नववर्षाची कामाची पोहच पावती घ्यावी . याबद्दल माहिती सांगितली.