MLA Shahajibapu Patil : विकासाच्या बाबतीत सांगोल्याची वेगळी ओळख निर्माण करणार

सांगोला मतदार संघातील गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करीत नाही, करणार नाही. तालुक्याच्या विकास निधीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे.
Mla Shahajibapu Patil
Mla Shahajibapu Patilsakal
Summary

सांगोला मतदार संघातील गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करीत नाही, करणार नाही. तालुक्याच्या विकास निधीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे.

सांगोला - मतदार संघातील गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करीत नाही, करणार नाही. तालुक्याच्या विकास निधीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. विकासाच्या बाबतीत सांगोला तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

सांगोला मतदारसंघातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाली असल्याची माहिती देताना आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, दुष्काळी तालुक्याची ओळख मी या पाच वर्षात पुसून काढणार आहे. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी मी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात मी निधी आणला असून यापुढेही विकास निधीसाठी प्रयत्न करीतच राहणार आहे.

गाव विकासासाठी आणलेल्या निधी बाबतीत पक्षभेदाची टीका चुकीची असून गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करणार नाही. सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा विकास करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. यामध्ये कधी कोणी राजकारण करू नये. निवडणुकीपूर्ती राजकारण समिती ठेवावे. विकासाच्या बाबतीत तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आश्वासनही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले.

Mla Shahajibapu Patil
शिक्षकांचा अनुशेष भरल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच; ३२ हजार शिक्षकांची लवकरच भरती

दलित वस्ती विकास कामांसाठी ५ कोटी ५८ लाख मंजूर

सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणेसाठी आर्थिक वर्ष २०२२ - २३ अंतर्गत सांगोला तालुक्यातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५ कोटी २३ लाख तर सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील दलित वस्ती विकास कामांसाठी 3५ लाख असा एकूण ५ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com