मोबाईल व दुचाकी चोरणारी टोळी सांगोला पोलिसांकडून जेरबंद! ३ पुरुष व एका महिलेचा समावेश

सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकींसह २१ मोबाईल हँडसेट, असा एकूण पाच लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
sangola crime news
sangola crime newssakal

महूद : सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकींसह २१ मोबाईल हँडसेट, असा एकूण पाच लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महूदसह सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारात या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

२६ जानेवारी रोजी महूद येथील यश हनुमंत कारंडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास मंगळवेढ्याचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील व सांगोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. चोरांचा छडा लावण्यासाठी एक स्वंत्र तपास पथक तयार करण्यात आले होते. २२ फेब्रुवारी रोजी बागलवाडी व अचकदाणी (ता. सांगोला) येथील दोन व्यक्ती त्यांच्याकडील कागदपत्रे नसलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडील विनाक्रमांकाची दुचाकी महूद(ता. सांगोला) येथून चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन जत, कोल्हापूर, कर्नाटक येथून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्या साथीदारांनाही जेरबंद केले. या गुन्ह्यात तीन संशयितांसह एक अल्पवयीन बालक देखील आहे.

३० जानेवारी २०२२ रोजी सांगोला येथील आठवडा बाजारातून शिवणे (ता. सांगोला) येथील तानाजी हरीबा घाडगे यांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. मोबाईल चोरणारी महिला पानवन (ता. माण, जि. सातारा) येथील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पानवन येथे जावून त्या महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून सांगोला तालुक्यातील विविध आठवडा बाजारातून व इतर ठिकाणाहून चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे तीन लाख ९७ हजार ५०० रुपयांचे तब्बल २१ मोबाइल हस्तगत केले. दरम्यान, मोबाईल आणि दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.

‘या’ पथकाची मोठी कामगिरी

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र राजुलवार, पोलिस हवालदार दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, अभिजीत मोहोळकर, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण वाघमोडे, प्रियंका बनसोडे, अर्चना चव्हाण व सायबर पोलिस ठाण्याचे युसूफ पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com