
मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी धनाजी सुरेश गावडे तर उपसभापती पदी प्रशांत भागवत बचुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Mohol APMC Result : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गावडे तर उपसभापतीपदी बचुटे यांची बिनविरोध निवड
मोहोळ - मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी धनाजी सुरेश गावडे तर उपसभापती पदी प्रशांत भागवत बचुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार यशवंत माने, लोकनेते शुगर चे अध्यक्ष विक्रांत पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली होती.
गुरूवार ता 10 रोजी सभापती,उपसभापतींच्या निवडी मोहोळ बाजार समिती कार्यालयात पार पडल्या. सभापती पदासाठी सावळेश्वरचे धनाजी सुरेश गावडे तर उपसभापती पदासाठी वरकुटे येथील प्रशांत भागवत बचुटे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
तत्पूर्वी माजी आमदार पाटील, आमदार माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, हनुमंत पोटरे, आदीनी संचालकांची मते जाणून घेतली व त्यानंतर सभापती व उपसभापती पदाची नावे जाहीर केली.
या प्रसंगी माजी आमदार पाटील आमदार माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, हनुमंत पोटरे, जगन्नाथ कोल्हाळ, माजी उपसभापती दत्ता पवार, माजी संचालक शशिकांत पाटील, मोहन होनमाने, बाळासाहेब पाटील,आनिल कादे, कालिदास गावडे आदी सह सर्व संचालक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.बी.माने यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव सचिन पाटील यांनी काम पाहिले.