'आजाराच्या नैराश्येतुन एकाची आत्महत्या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Lavate

आजाराच्या नैराश्यातून एका 40 वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Mohol Suicide : 'आजाराच्या नैराश्येतुन एकाची आत्महत्या'

मोहोळ - क्षयरोग व दम्याच्या आजाराच्या नैराश्यातून एका 40 वर्षीय प्रौढाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ता 3 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी घडली. सतीश आदिनाथ लवटे रा (कुंभार खाणी) मोहोळ असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत सतीश यास क्षयरोग व दम्याचा आजार होता. गुरुवार ता 2 रोजी तो घरातून औषध उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्नालयात जाऊन येतो असे म्हणून घरातून निघून गेला. दरम्यान त्याची वाट पाहून व घरी न आल्याने गुरुवारी सतीश हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिसात दाखल केली होती.

दरम्यान शुक्रवारी त्याने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गा जवळील चंद्रमौळी औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या बीपीएड कॉलेज या ठिकाणी चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची खबर संतोष आदिनाथ लवटे वय 48 रा कुंभार खाणी मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :moholdepression